

पुणे विधान परिषद निवडणुकीत नवी राजकीय घडामोड समोर आली आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेने सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार
महायुतीतील राजकीय चुरस वाढली
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमध्येच कुस्ती पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीत एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न सत्तेत सहभागी असलेले घटकपक्ष करत आरहेत. या निवडणुकीत अमरावतीच्या घडामोडीचे पडसाद पुण्यात उमटताना दिसत आहेत. पुण्यात भाजपच्या कौस्तुभ गावडेंविरोधात शिवसेनेने आपला उमेदवार उभा केलाय. शिंदे गटाकडून सचिन सानप यांना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहे.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच महायुतीत घमासान सुरूयय. पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयासाठी विजयासाठी भाजपनं कंबर कसलीय. सचिन सानप हे अपक्ष उमेदवार असल्याचं सांगतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कौस्तुभ गावडेंच्या विजयासाठी काम करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी केला होतं. मात्र शिवसेनेनं या निवडणुकीत वेगळा निर्णय घेत सचिन सानप यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केलंय. यामुळं महायुतीतील धुसफूस समोर आलीय.
पुण्यातील महायुतीमधील बिघाडीला अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरी कारण ठरलं. अमरावतीमध्ये भाजपचे ३ बंडखोर अद्यापही रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेनं विद्यमान आमदार किरण सरनाईक यांना उमेदवारी दिलीय. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी देखील बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय.
तिवसा मतदारसंघात भाजपच आमदार राजेश वानखेडे यांचे मेहुणे शेखर भोयर, भाजप आमदार उमेश यावलकर यांचे निकटवर्तीय सुमित पवार आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनी बंडखोरी केल्याचं दिसतंय.
सचिन सानप यांच्या उमेदवारीसंदर्भातील अधिकृत परिपत्रक शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक २०२६ साठी सचिन नवनाथ सानप यांना शिवसेना पक्षाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.