महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

Maharashtra Legislative Council Polls: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी देण्यात आलीय.
Maharashtra Mlc Election 2026: Congress Announces Candidates For Nagpur And Pune
Maharashtra Mlc Election 2026: Congress Announces Candidates For Nagpur And Punesaam tv
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झालीय.

  • काँग्रेसने नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिलीय.

  • पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळालीय.

विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. (Maharashtra Mlc Election 2026: Congress Announces Candidates For Nagpur And Pune)

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळालीय ते जाणून घेऊ. हाती आलेल्या माहितीनुसार, नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Mlc Election 2026: Congress Announces Candidates For Nagpur And Pune
Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघासाठी पुन्हा एकदा अभिजीत वंजारी यांनाच संधी देण्यात आलीय. पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती शिक्षक मतदार संघामधून आधीच आदिती पोहोरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी होती.

Maharashtra Mlc Election 2026: Congress Announces Candidates For Nagpur And Pune
विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी महाआघाडीत फूट; काँग्रेसला मित्रपक्षानेच दिलं आव्हान

प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केलीय. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com