
० पोलादपुर महाबळेश्वर जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली
० तीन ठिकाणी घाट रस्त्यात डोंगरातील माती खाली आल्याने रस्ता वाहतुकीसाठी दोन तासांपासून बंद
० JCB च्या मदतीने दरडीची माती आणि दगडी रस्त्यावरून हटवण्याचे काम सुरु
आरोपी विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण न्यायालयाने केला जामीन मंजूर
साक्षी गवळी ही पीडित अल्पवयीन मुलीच्या हत्येत सहभागी नसून मृतदेहाची विल्हेवाट लावत पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याने तिच्यावर हत्याचा व अपहरणाचा कलम लागू होत नसल्याचे सांगत वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता
समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या सहापैकी एक तरुण बेपत्ता. सातपाटी मधील मुस्लिम मोहल्ला येथील उमेद इमरान शेख हा तरुण समुद्राच्या पाण्यातील लाटां सोबत वाहून गेल्याने बेपत्ता . इतर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश . समुद्रातील लाटांचा वेग वाढवल्याने शोध कार्यात अडथळे. क्रिकेट खेळत असताना अचानक समुद्रात उतरलेल्या सहापैकी एका तरुणाला बाहेर काढण्यात स्थानिकांना अपयश . स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू .
वर्धापन दिनाच्या भाषणात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका केलीय. ज्या माकडांना माणसं केली, त्यांनीच पाठित वार केला अशी टीका राऊत यांनी केलीय.
उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी पोहोचले आहेत. थोड्यावेळात उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळं रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात पावसाचा जोर दुपारनंतर कमी झाला. त्यामुळं पुराचं पाणी ओसरून जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. रोहा, नागोठणे आणि पाली येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कल्याण पूर्व खडेगोलवली येथील 100 फूट रस्त्यालगत कल्याण पूर्वेतून उल्हासनगरला जाणारा ब्रिज खचला
पुलावरील वाहतूक करण्यात आली बंद
वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली
शितोळे सरकारचे मानाचे अश्व आळंदीच्या मुख्य मंदिरात दाखल
रात्री ८.३० वाजता मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात होणार
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला रात्री ८.३० वाजता होणार सुरुवात
जगबुडी नदीला आलेल्या पुराचं पाणी खेड बाजारपेठेत घुसलं
जगबुडी नदी सध्या धोक्याच्या पातळीवर
पाणी पातळी 10.25 मीटरवर
दुकानांमध्ये शिरले पाणी
जनजीवन विस्कळीत
प्रशासन अलर्ट मोडवर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात षन्मुखानंद सभागृहाकडे रवाना होणार
आज शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन
मेळाव्यातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकणार
संत ज्ञानेश्वर माऊलींचे समाधीस्थळ असलेल्या आळंदीप्रमाणे माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीतून आज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. अहिल्यानगर जिल्ह्यासह संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. हजारो वारकरी विठूनामाचा जयघोष करत आज पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले. नेवासा नगरीत माऊलींच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अतिवृष्टीमुळं महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर डोंगरावरील मातीचा ढिगारा कोसळला. चिखली शेडजवळ हा रस्ता खचला आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. महाबळेश्वर बांधकाम विभागाकडून या रस्त्याचा दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले. पावसामुळं कामात अडथळा येत आहे. जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
अमरावती शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा आनंदी
पेरणीच्या कामांना येणार वेग
शेतकऱ्यांना दिलासा
आळंदीमध्ये मुख्य पालखी सोहळ्यापूर्वी होणार पालखी प्रदक्षिणा सोहळा
दर गुरुवारी आळंदीमध्ये पार पडतो पालखी प्रदक्षिणा सोहळा
यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी आल्यामुळे आधी प्रदक्षिणा सोहळा होणार
प्रदक्षिणा सोहळा संपल्यावरच मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात होणार
नागपूर जिल्ह्यातील मौदामध्ये काँग्रेसकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई आदी मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक झाला आहे. जयस्तंभ चौकापासून निघालेल्या या मोर्चात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कल्याणसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस
कल्याण तालुक्यातील काळू नदीची पातळी वाढली
टिटवाळाजवळील रुंदे पूल पाण्याखाली
रुंदा, उशिद, मढ, आरेले, भोंगाळपाडा आदी गावांचा संपर्क तुटला
तहसील प्रशासनाकडून ग्रामस्थांना पर्यायी पुलावरून वाहतूक करण्याच्या सूचना
उल्हास नदीची देखील पातळी वाढली
नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
आळंदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत असताना ड्रोन पडल्यामुळं वाढवला बंदोबस्त
कराड :
पाटण तालुक्यात जानुगडेवाडीत भीषण अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस उलटली
३० प्रवासी जखमी, शालेय विद्यार्थ्यांची संख्या अधिक
जखमींवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार
अपघातानंतर बसचालक पसार
नवी मुंबई :
सायन - पनवेल हायवेवर तुर्भे ते नेरूळ दरम्यान वाहतूक कोंडी
तुर्भे उड्डाणपुलावर ट्रेलर बंद पडल्याने खोळंबा
पोलिसांकडून ट्रेलर बाजूला करण्याचे काम सुरू
मध्य रेल्वेच्या सेवा आज सकाळपासून तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाल्या आहेत. लोकल ट्रेन तब्बल पाऊण तास उशीराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पळून गेलेल्या तरूणीच्या लग्नात साक्षीदार झाला म्हणून एकाला मारहाण.
जयसिंगपूरमधील तरूणाने सांगली जिल्ह्यातील मुलीसोबत लग्न केल्याने नातेवाईकांचा संताप.
कोल्हापूरच्या साक्षीदाराला नातेवाईकांकडून चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल.
पुण्यातील बावधन परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये आज सकाळी झालेल्या पावसामुळे पाणी शिरले होते
महानगरपालिका अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी यांच्या मदतीने पाणी काढण्यात आले
पुण्यात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक सोसायटीत पाणी शिरले होते
रत्नागिरी - खेड बाजारपेठ मध्ये जगबुडी नदीचे पाणी भरण्यास सुरुवात, गांधी चौकपर्यत आले पाणी
जगबुडी नदी ची पाण्याची पातळी ९.४० वर
नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर
वडगाव, शिरगाव, तुळशी या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे त्यामुळे पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
खेड मध्ये एन. डी.आर.एफ. टीम दाखल होणार तहसीलदार सोनावणे यांची माहिती
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे येथून यंदा पहिल्यांदाच संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरला जात आहे.. पालखीतील रथ ओढण्याचा मान निंभारी येथील संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव यांच्या राजा आणि सोन्या या बैलजोडीला मिळाला आहे.. पहिल्यांदाच हा मान मिळाल्याने जाधव कुटुंबीय सुखावले आहे.. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कर्मभूमीतून पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.. यंदाच्या पहिल्याच वर्षी तालुक्यातील पशुप्रेमी म्हणून ओळख असलेले कैलास जाधव यांच्या खिल्लारी बैलजोडीस पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळाला आहे.
पुण्यातील धानोरी, टिंगरे नगर, मुंजाबा वस्ती भागात पाणीच पाणी
रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप
अनेक वाहनं रस्त्यावरील पाण्यात पडली बंद
पावसामुळे रस्त्यावर साठलेल्या पाण्यात स्कूल व्हॅन सुद्धा पडली बंद
- झाड गाडीवर कोसळल्याने चार चाकी वाहनाचे नुकसान
- नाशिकच्या वडाळा रोड परिसरात असलेल्या हिरवे नगर येथील सादिक हुसेन उद्यानातील घटना
- काल पासून सुरु असलेल्या पावसाने नाशिक शहरात कोसळले गुलामोहाराचे झाड
- थेट मुळापासून कोसळले झाड
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांना पोलिसांकडून दिली जात आहे मानवंदना
सोलापुरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय ईतमामात होत आहेत अंत्यसंस्कार
मारुती चितमपल्ली यांच्या अंत्यविधीला सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लावली हजेरी
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे मंडणगड - दापोली मार्गावर मोठे झाड पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काही वेळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी च्या सहाय्याने झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
हा मार्ग दापोलीतून मंडणगड मार्गे मुंबई येथे जाणारा हा राज्यमार्ग आहे. झाड पडून हा मार्ग वाहतुकीस बंद झाल्याने वाहनांची मात्र मोठी रांग लागली होती
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील २४ तासांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता
पुणे जिल्हा प्रशासनाने दिली माहिती
पुण्यासह पालघर आणि नाशिकमधील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे
- सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर
- गोदावरीला यंदाच्या हंगामातील पहिला पूर
- रामकुंड, गोदा घाटाचा परिसर पाण्याखाली
- रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा
अनिल मोरे या मृत्य मुखी पडलेले व्यक्तीचा नाव आहे..
अनिल मोरे दररोज वाशिंद येथून मुंबई कडे प्रवास करायचे...
काही दिवसा पूर्वी मुंब्रा येथे लोकल ट्रेन मध्ये प्रवास करत असताना १४ प्रवासी पडले होते आणि या मध्ये ४ जणांचा मृत्यू देखील झाला होता तर इतर यांचा उपचार कळवा हॉस्पिटल आणि ज्युपिटर रुग्णालय मध्ये सुरू होता...
अनिल मोरे याला कळवा रुग्णालय ने पुढील उपचारा साठी ज्युपिटर रुग्णालयला ट्रान्स्फर केला गेली होता...
आज दुर्दैवी अनिल मोरे यांचा मृत्यू झालेला आहे...
पुण्यातील पाषाण भागातील घटना
पुण्यात निशिगंध इमारतीसमोर एक मोठे झाड पडले
या घटनेत एक चारचाकी आणि एक दुचाकी अडकली
या घटनेत सी-डॅक सेंट्रल गव्हर्नमेंट कॉलेज येथे शिकत असलेली काजल नावाची नावाची विद्यार्थिनी झाडाखाली सापडली
झाडाखाली सापडल्याने जखमी विद्यार्थिनीला अग्निशमन विभागाच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केले आहे
पुणे -
दमदार पावसामुळे पुन्हा एकदा हिंजवडीतील रस्ते पाण्याखाली
हिंजवडीतील फेस ३ जवळील भोईरवाडी परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाच पाणी तुंबले आहे.
तर काही ठिकाणी रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आले आहे.
आयटी पार्क परिसरातील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याने पाणी रस्त्यावर साचू लागला आहे
त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे
मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही.
वसई विरार शहरात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नालासोपाराच्या बावसेतपाडा येथील घराची भिंत कोसळण्याची दुर्घटना घडली
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही
मात्र घरामधील साहित्यांचे मोठे नुकसान झाले
पुण्यात झाड कोसळून दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान
पुण्यातील कोथरूड भागातील घटना
सुदैवाने वाहने पार्क केल्यामुळे तिथे कुठलीही जीवितहानी झाली नाही
कोथरूड पोलिस ठाण्यातील झाड बाहेरच्या बाजूला कोसळले
बाहेरील बाजूस पडल्यामुळे उभे असलेल्या वाहनांवर कोसळले झाड
झाड कोसळल्याने तीन दुचाकी आणि एका कारचे नुकसान झाले
खडकवासला धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरू
आज खडकवासला धरण क्षेत्रातून 1920 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
गेले काही दिवसापासून खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुळा मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय
द्यस्थितीचा पाऊस व धरणातील पाणीसाठी वाढल्यामुळे कोथुरने ओढा (पवना नदी) मध्ये मळवंडी ल.पा. तलाव 100% भरून अनियंत्रित विसर्ग चालू झालेला आहे.
आज खडकवासला धरण क्षेत्रातून 1920 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू
गेले काही दिवसापासून खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुळा मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जातोय
- शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी
- रस्त्यांना तळ्याचं स्वरूप, गुडघाभर पाण्यातून वाहनचालकांना काढावी लागतेय वाट
- धुवाधार पावसाने नाशिकला झोडपलं
- गडकरी चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना करावी लागतेय तारेवरची कसरत
नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांची चाळण झालेली असून शहादा शहरात असलेल्या दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक समोर एक मालवाहक ट्रक पाच फूट खोल खड्ड्यात रुतल्याने अपघात घडला असून शहरातील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.. मालवाहतूक ट्रक रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात कोसळल्याने काही वेळासाठी परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जेसीबीच्या सहाय्याने ट्रकला बाहेर काढण्यात आले...
रत्नागिरी - खेडमध्ये पडणा-या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलीय.इशारा पातळीवर वाहणा-या जगबुडी नदी आता धोका बातळीवरुन वाहतेय.सध्या जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी 7.30 मीटर इतकी आहे त्यामुळे खेडमधील सखल भागात पाणी शीरु लागलय.मटणमार्केट परिसरात देखील पाणी शिरु लागलंय सकाळी खेडमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती मात्र आता सरीवर कोसळणा-या पावसानं जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागलीय
- त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे पोहचली आहे.. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात आज पालखीचा दहावा मुक्काम असणार आहे.. तत्पूर्वी पालखी श्रीरामपूर शहरात दाखल होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.. स्थानिकांकडून ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली आहे..
ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा
3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. हा इशारा 18-06-2025 रोजी सायंकाळी 17:30 वाजल्यापासून ते 19-06-2025 रोजी रात्री 23:30 वाजेपर्यंत लागू आहे.
या दरम्यान समुदामध्ये लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीजवळील पर्यटन व जलक्रीडा पूर्णतः थांबवण्याचाही ईशारा देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
- गोंदे फाटा येथे वाहतूक कोंडी
- एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
- महामार्ग पोलिस केंद्र घोटीचे कर्मचारी दाखल
- वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
थोड्याच वेळात पाण्याचा विसर्ग नदीत होणार
नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन
तीच नदीकाठ परिसरात ज्यांनी गाड्या आणि जनावर आहेत त्यांनी काढून घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे
पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार
यंदाचा मोसमात पहिल्यांदा होणार पाण्याचा विसर्ग
नारंगी बायपास रस्त्यावर मालवाहू गाडीचा बिघाड झाल्याने रस्त्यातच गाडी बंद
किलोमीटर पर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची दमछाक
शाळेच्या वेळेत टेम्पो बंद पडल्यामुळे किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी
दोन तासाच्या वाहतूक कोंडीचा फटका बसला शाळकरी मुलांना
मुख्य वर्दळीच्या रस्त्यात टेम्पो बंद पडल्यामुळे झाली वाहतूक कोंडी.
० आंबा नदीने धोका पातळी ओलांडली
० आंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी नागोठणे बाजार पेठ, ST स्टँड परिसरात घुसले
० पुराचे पाणी शिरल्याने नागोठणे ST स्टँड रिकामे करण्यात आले
० बाजार पेठेत पुर पहाण्यासाठी त्याच बरोबर जिवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी नागरीकांची गर्दी
बीड जिल्ह्यात शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाला आळा बसण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलिस आपल्या बांधावर हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात शेतीच्या बांधावरून होत असलेल्या वादाला आता हा बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे याविषयी काय म्हणतात पोलीस अधीक्षक नवनीत कावत आपण पाहूया...
बीड जिल्ह्यात आता शेतातील वादांना आळा बसणार आहे. कारण पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलिस आपल्या बांधावरचा अभिनय उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून शेतातील तंटे सोडविले जाणार आहेत.
- अर्धा जून महिना संपला तरी अद्याप नाफेडकडून कांदा खरेदीला सुरुवात नाही
- नाफेड आणि NCCF कडून यंदा करण्यात येणार आहे ३ लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी
- नाफेडकडून एप्रिल महिन्यात १० टक्के, मे महिन्यात ४५ टक्के तर जूनमध्ये उर्वरित ४५ टक्के कांदा खरेदीचं ठेवण्यात आलं होतं उद्दिष्टं
- मात्र जून महिना संपत आला, तरी अद्याप नाफेडकडून कांदा खरेदीला मुहूर्त नाही
- मागील वर्षी देखील बॅक डेटेड कांदा खरेदी दाखवून नाफेडच्या कांदा खरेदीत समोर आला होता कोट्यवधींचा गैरव्यवहार
फडतरवाडीत कृष्णा जाधव यांच्या वस्तीवर बिबट्याने महिन्यात सलग तीन वेळा हल्ला करत दोन कुत्रे आणि एका वासराचा बळी घेतला आहे.पहिल्या दोन घटनांनंतर जाधव यांनी सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आणि अखेर रात्री बिबट्या कॅमेरात कैद झाला आहे.या घटनेनंतर वनविभागाला माहिती देण्यात आली असून त्यांनी ठसे तपासले आहेत. मात्र, अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात न आल्याने जाधव कुटुंबीयांसह गावकरी भीतीच्या छायेत असून, बिबट्याला कधी पकडणार? असा सवाल उपस्थित करत आहेत.
आषाढी यात्रेच्या निमित्ताने वीज दुरुस्तीची कामे सुरू...
वीज पुरवठा बंद राहणार असल्याने शहरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार...
आज आणि उद्या सकाळी आणि संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही....
नागरिकांनी पाणी जपून वापरावे...
नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन...
उड्डाणपूला खालील चौकात ही मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याकारणाने उड्डाण पुलावर देखील आता वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
वाहतूक पोलीस ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत
मात्र विक्रोळी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलामुळे काहीशी वाहतूक कोंडी कमी होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र ही वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला असुन रात्री ८ वाजता पालखी प्रस्थान ठेवण्यात येणार आहे
माऊलींच्या पालखीची प्रस्थान गुरुवारच्या दिवशी आल्याने माऊलींची विवथ गुरुवारची पालखी प्रदक्षिणा झाल्यानेच आषाढी वारीचे पालखी सोहळा संजीवन समाधी मंदिरात रंगणार असुन रात्री ८ वाजता माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवेल..
भर पावसाळ्याच्या ऋतूत शेतकऱ्यांची पीक जगवण्यासाठी तुषार सिंचन लावून धडपड...
अनेक ठिकाणी पावसानं खंड दिल्याने पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याचे चित्र....
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी सिंचनाच्या माध्यमातून जगवताय आपल्या शेतातील पीक..
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था नाही त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता..
खाजगी प्रवासी ट्रॅव्हलवर लुटारुंची दगडफेक
समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने वारंवार वाहनांवर आणि प्रवाशांवर हल्ले
दगडफेकी मध्ये वाहन चालक जखमी, यापूर्वी दगडफेकीच्या घटना घडल्याचे समोर आले होते
समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना चोरट्यांची भीती
पुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यावर पाणी
सकाळच्या सुमारास शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक कोंडी
धायरी सिंहगड रोडवर झाली वाहतूक कोंडी
पुण्यात सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पुण्यातला सिंहगड रोड परिसरात हिंगणे खुर्द मध्ये टेकडीवरून येणार पाणी येत आहे. धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाला आहे. या भागात काही घर आहेत त्या घरांची पाणी शिरल्याची माहिती आहे.शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या हवाई सुंदरी रोशनी सोनघरे हिचे पार्थिव आज तिच्या डोंबिवलीतील घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
न्यू अमिया सोसायटी, डोंबिवली (पूर्व) येथे मृतदेह आणण्यात आला.
परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीय व नातेवाईकाना अश्रू अनावर
तिचे मित्र-मैत्रिणी, शेजारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
ही दुर्दैवी घटना 12 जून रोजी घडली होती. आठवड्यानंतर तिचे पार्थिव काल तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले होते
० रायगडमध्ये जोरदार पाऊस
० हवामान खात्याच्या आतीवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी शाळा कॉलेजला जाहिर केली सुट्टी
० जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा सोडण्यात आल्या तर दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी
० उत्तर रायगडमधील खोपोली, पेण, रोहा परिसरात जोरदार पाऊस
० कुंडलिका आणि आंबा या दोन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली
० नदी किनारी रहाणाऱ्या नागरिकांसह सर्वांना सतर्कतेचा इशारा
- येत्या शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद, तर रविवारी सकाळीही कमी दाबाने होणार पाणीपुरवठा
- महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील देखभाल दुरूस्तीसह नवीन वॉल्व्ह, फ्लो मीटर बसवण्याच्या कामासाठी शनिवारी शट डाऊन
- स्मार्ट सिटी कंपनीकडून केली जाणार जलशुद्धीकरण केंद्रावर देखभाल दुरूस्ती आणि विकास कामं
- शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन
मध्यरात्री किनारपट्टी भागाला पावसाने झोडपले
वेगवान वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी
किनारपट्टी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात सरींवर पाऊस.. रात्रीच्या वेळी जोरदार सरी
जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसामुळे गेल्या 15 दिवसांत जवळपास दिड कोटीचं नुकसान झालय.अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ते खचले, पुलांना बाधा झाली, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. 130 कच्च्या व पक्क्या घरांचे सुमारे 44 लाखांचे नुकसान झाले, तर सार्वजनिक मालमत्तांचे जवळपास एक कोटीहून अधिक असे एकूण दीड कोटीचे नुकसान जिल्ह्यात झालेय. या पावसामध्ये पाण्यात बुडून तसेच वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर संरक्षक भिंत कोसळून व अन्य घटनांनी पाच जण जखमी झालेत.
इंद्रायणी नदीला पाण्याचा वेग वाढल्याने प्रशासन एनडीआरएफ सज्ज झालय
आज माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना इंद्रायणी काठावर वारकरी पाऊसाचा आनंद घेत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी
२)
Anc :- इंद्रायणी काठी वरुणराजाचे महिलांनी स्वागत केलय
यावेळी माऊलींच्या पालखी सोहळ्याला अभंगवाणीतुन इंद्रायणी काठच्या आळंदीच महत्व अधोरेखित केलय
यावेळी महिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे
३)
Anc :- आळंदीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात उतरु नये असे करण्यात आले
कसबा विधानसभा मतदार संघावरून राजकीय रणकंदन माजले, धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी पक्ष सोडला होता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली होती
माजी महिला महापौर म्हणून परिचित असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्या कमल व्यवहारे यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला त्या कमल व्यवहारे यांची कॉंग्रेस पक्षात घर वापसी झाली
प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ , पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. पक्षाचे काही निर्णय चुकले असतील तरी त्यामुळे व्यथित झालेल्या कमल व्यवहार यांना पक्षाने पुन्हा योग्य जबाबदारी देण्याचा आश्वासन दिला आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमल व्यवहारे यांची घरवापसी
सांगलीच्या मिरज शहरामध्ये अंधाराचा फायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी दारू प्राशन करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी दणका दिला आहे.शहरातल्या मार्केट यार्ड मधील जनावरांच्या बाजारामध्ये अंधारात मध्ये प्राशन करणाऱ्या जवळपास 24 जणांना धडक कारवाई करत दारूसह ताब्यात घेण्यात आले आहे.महात्मा गांधी चौकी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी अंधाराचा फायदा घेत शहरातील अनेक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या तक्रारी नागरिकाकडून करण्यात येत होत्या,त्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक, पक्षीशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्य, पर्यावरण, सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने निसर्गाशी संवाद साधण्याची नवी दृष्टी देणारा तपस्वी अरण्यऋषी हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लाखांदूर-पिंपळगाव रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात ट्रान्सफॉर्मर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली.या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगीचे ठीनगे ट्रांसफार्मर खाली असलेल्या वाढलेल्या पाला पाचोळ्यावर पडल्याने क्षणातच आगीचा वणवा उडाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.धुराचे लोट दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ लाखांदूर नगर पंचायतच्या अग्निशामक विभागाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या वाहनाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश आले.आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र वेळीच मिळालेली मदत आणि नागरिकांची तत्परता यामुळे मोठे नुकसान टळले.
मान्सून आणि मान्सूनपूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्याने पेरणी केली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 16 टक्के इतकी पेरणी झाली आहे. परंतु मागील सात ते आठ दिवसापासून पावसाने नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात दडी मारली आहे. पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरी तुषारच्या साह्याने पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. दरम्यान अजून चार ते पाच दिवस पाऊस नाही पडला तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नांदेड जिल्ह्यात ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागली आहे.
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाराशिव विमानतळ परिसरातील रस्त्यावरून ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडील एक गावठी पिस्टल, तीन जिवंत काडतुस,कोयता कार व दो दुचाकी कसा ५ लाख ५ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्या आहे.पोलिसांना पाहताच दोन आरोपी दुचाकीवरून पसार झाले या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रास्त गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ही कारवाई केली आहे.
भोकरदनहून जालन्याकडे येणाऱ्या एका कंटेनरमधून पोलिसांनी 28 बैलांची सुटका केली आहे. सदर बाजार पोलिसांनी हि कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह 49 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे..गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी रात्री ही कारवाई केली आहे.पोलिसांनी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे. शेख सलीम शेख सुलतान,शेख अमीर शेख बशीर अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे असून तिसरा आरोपी शेख मुज्जू शेख अयुब पोलिसांना चकमा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्यामुळं पोलिस आता फरार आरोपीचा शोध घेत आहे
बच्चू कडू यांना विभागीय सहनिबंधकांनी अपात्र केल्याचे प्रकरण...
बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव...
बच्चू कडू यांच्या अपात्रतेवर आज दुपारी न्यायालयात सुनावणी..
बच्चू कडू यांच्या विरोधात दिलेल्या निर्णया विरोधात बच्चू कडूंनी दाखल केली याचिका...
बच्चू कडू यांना दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष..
नाशिक मधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा ठोठावली होती त्याचाच आधार घेऊन विभागीय सहनिबंधक यांनी बच्चू कडूंना केलं अपात्र.
खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये एकूण 7.40 टीएमसी म्हणजे 25.39 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी साठा फक्त 3.62 टीएमसी म्हणजे 12.43 टक्के इतका होता.
म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे.पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.
खडकवासला 1.28 टीएमसी
पानशेत 2.16 टीएमसी
वरसगाव 3.67 टीएमसी
टेमघर 0.29 टीएमसी
रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
राज्यातील रायगड,रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील खाट विभागात पुढील 48 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय..
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या २० जून ते २३ जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील.
या पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
असा राहील पोलिस बंदोबस्त
अतिरिक्त आयुक्त- ४
पोलिस उपायुक्त - १०
सहाय्यक आयुक्त- २०
पोलिस निरीक्षक- १२८
सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- ५१३
पोलिस अंमलदार- ६१४३
एसआरपीएफ- एक कंपनी
होमगार्ड- १२४०
क्यूआरटी- १२
बीडीडीएस- सहा पथके.
मुसळधार पावसामुळे मुळामुठा नदीला पूर आल्यास नागरिकांच्या घरात पाणी घुसल्यास त्यांच्या निवासासाठी महापालिकेने शहरात ७१ ठिकाणी सोय केली आहे. गेल्यावर्षी नदीला पूर आल्यानंतर नागरिकांच्या निवासाची गैरसोय झाली होती. त्यामुळे प्रशासनाने यंदा तयारी करून ठेवली आहे.
या ठिकाणांची यादी व संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष सुरु केले आहेत. हे कक्ष २४ तास सुरू राहणार आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून त्यांना आवश्यक साधनसामग्रीही उपलब्ध करून दिली आहे.
शहरात पूरस्थिती निर्माण झाल्यास व मदतीसाठी याठिकाणी संपर्क साधावा ः ०२०-२५५०१२६९२, ०२०-२५५०६८००३, ०२०-६७८०१५०० असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त यांनी केले आहे.
- सुवर्णाचं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग २०२२ परीक्षा मध्ये उल्लेखनीय यश
- सुवर्णा हिने महाराष्ट्रात आठवा क्रमांक, तर विदर्भातून प्रथम क्रमांक मिळवला
- सुवर्णाने मुख्य परीक्षेच्या पेपर -१ सिव्हिल मध्ये राज्यामध्ये सर्वाधिक गुण मिळविले
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली त्यानुसार ठाकरे गटांनी सुद्धा नवी मुंबईतील प्रश्नांसंदर्भामध्ये नवी मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीमध्ये सोसायटीकडून मागण्यात आलेल्या वृक्ष छाटणीच्या परवानगी तत्काळ देण्यात याव्या औषध फवारणी नवी मुंबई शहरात तातडीने करण्यात यावी उद्यान विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साफसफाई केली जात नाहीये अशा विविध मागण्यांसाठी ठाकरे गटांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे बैठकीचे नियोजन करण्यात आलं होतं.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आता मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली त्यामुळे नवी मुंबईच्या प्रश्नांसाठी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांकडे नवी मुंबईच्या प्रश्नांसंदर्भामध्ये बैठकीचा आयोजन करण्यात आलंय या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्त प्रश्न ऐरोली काटई नाका उन्नत मार्ग ,महानगरपालिके क्षेत्रातील 500 चौरस फूट क्षेत्रफळाचे घरांना मालमत्ता कर माफ करण्याबाबत ,प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करण्याबाबत शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्प मधील बाधित झालेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई बाबतमराठी भाषा भवन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न इत्यादी विषयांवर मुख्यमंत्री वनमंत्री गणेश नाईक सिडकोचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यात बैठक पार पडणार आहे.
त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता यावी यासाठी मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडून जोरदार मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कामगारांना तीन महिन्यापासून पगार मिळाला नाहीये तसेच त्यांना पीएफ हा सुद्धा 14 महिन्यांपासून मिळत नाहीये त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे मुलांचे शाळा सुरू झाले आम्ही करायचं काय असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत तसेच ठेकेदारांकडून या कामगारांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाही येत असा आरोप कामगारांकडून केला जात आहे
धाराशिव जिल्ह्यात यंदा मे महीन्यात अनेक भागात दमदार पाऊस झाला याचा फटका फळ पिकांसह बागायती पिकांना मोठ्या प्रमाणावर बसला.कृषी व महसूल विभागाच्या पथकाने नुकसानीचे पंचनामे केले असता तब्बल 10 हजार 846 शेतकऱ्यांचे 4 हजार 694 हेक्टर 15 आर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.प्रशासनाने शासनाकडे 8 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान आता मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- पुणे नाशिक महामार्ग आणि आळंदी कडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
- वाहनाच्या पाच किलोमीटर पर्यंत रांगा
- संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान आज आळंदी येथून होणार
- पालखी प्रस्थानाला पावसाची सकाळपासूनच जोरदार हजेरी..
धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत 50 गाईसह 2 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या गाई कत्तलसाठी धाराशिव येथे अकलूज येथून आणल्या असुन पोलिसांनी गाई,वाहन व 2 आरोपीना ताब्यात घेतले आहे. दोन ट्रकमध्ये गाई बांधून कोंबण्यात आल्या होत्या.ज्या चालकांना ताब्यात घेतले आहे त्यांना धाराशिव येथे गाई कुठे सोडायच्या आहेत हे सांगितले होते या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे ते सांगत आहेत. गोवंश तस्करी करणारी मोठी टोळी धाराशिव शहरात व जिल्ह्यात सक्रीय असुन याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व त्यांच्या पथकाने यांनी ही कारवाई केली आहे असुन धाराशिव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथील कासाळ ओढ्यावरचा पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
येथील ग्रामस्थांनी ओढ्यावर पाईप टाकून तात्पुरत रस्ता तयार केला आहे, पण पावसाच्या पाण्यामुळे हा तात्पुरता पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. विद्यार्थी आणि ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे. कायमस्वरूपी पूल बांधावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
आरण्यऋषी पदमश्री मारुती चितमपल्ली यांच्यावर आज सोलापुरातील तुळजापूर नाका हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.दुपारी 12 मारुती चितमपल्ली यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर अक्कलकोटरोड वरून निघणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.