अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना राज्य सरकारनं दिलं दिवाळीचं गिफ्ट; महायुती सरकारनं घेतला मोठा निर्णय

Maharashtra Anganwadi Workers Diwali Bonus : महाराष्ट्र सरकारकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट जाहीर केलीय. किती कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आणि किती निधी उपलब्ध करून देण्यात आलाय ते जाणून घ्या.
Maharashtra government Diwali gift for Anganwadi workers 2026
Maharashtra government Diwali gift for Anganwadi workers 2026saam tv
Published On: 

वैदेही कानेकर, साम प्रतिनिधी

राज्यातील शेतकऱ्यांनंतर सरकारनं अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा केलीय. सरकारनं अंगणवाडी सेविका व मदतनीसांना भाऊबीज भेट दिली आहे. राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविकांसाठी प्रत्येकी २ हजार रुपये भाऊबीजची भेट म्हणून दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावर पदोन्नतीच्या वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णयानंतर सरकारनं घेतलेल्या या निर्यणामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Maharashtra government Diwali gift for Anganwadi workers 2026
शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

या निर्णयाचा राज्यातील एकूण २ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. या योजनेसाठी शासनाकडून एकूण ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. दिवाळीपूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांना ही रक्कम देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलंय.

Maharashtra government Diwali gift for Anganwadi workers 2026
पीएम किसान योजनेतून ४,००० नावे वगळली जाणार; शासनाकडून कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन, काय आहे कारण?

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून बालकांचे पोषण, आरोग्यविषयक जनजागृती आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यांसारखी महत्त्वाची कामे करतात. राज्य सरकारकडून यंदाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळी भाऊबीज भेट दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊबीजचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड व्हावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com