आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; वसतिगृहांचा शासन निर्णय अखेर रद्द!

Tribal Hostel Limit Decision Cancels: आदिवासी विद्यार्थ्यांच्या १३ दिवसांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने १४ ऑगस्ट २०२६ रोजीचा वसतिगृहासंबंधी शासन निर्णय आणि सुधारित नियमावली रद्द करण्याचा निर्णय घेतला. ३० वर्षांची वयोमर्यादाही हटवण्यात आली.
Tribal Hostel Limit Decision Cancels
Tribal Students Protest: Hostel Government Order Cancelled, 30-year Age Limit Scrappedsaam tv
Published On
Summary
  • आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठी ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द

  • पुण्यातील आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश

  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर सरकारचा मोठा निर्णय

गेल्या १२ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी पुण्यातील मांजरी येथे आदिवासी विद्यार्थी आंदोलन चालू आहे. त्यातील एका आंदोलकांची प्रकृती खालावल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळलाय. त्याचदरम्यान सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासनाने आज आंदोलनाच्या १३ दिवशी वसतीगृहाबाबतचा निर्णय अखेर रद्द केलाय.

Tribal Hostel Limit Decision Cancels
Palghar Tribal Ashram School : आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना! पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर आणि वाढत्या दबावानंतर अखेर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेत आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी लाग करण्यात आलेली ३० वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्यात आलीय. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने त्याचबरोबर लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींचा विचार करून १४ ऑगस्ट २०२६ रोजीचा शासन निर्णय तसेच त्यानुषंगाने जारी करण्यात आलेली एकत्रित सुधारित नियमावली ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वूईके यांनी दिली.

शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रवेश प्रक्रिया तसेच वसतिगृह व्यवस्थापनाच्या विविध बाबींवर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या निवासस्थानी ‘लोहगड’ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी माहिती दिली. या बैठकीस मंत्री नरहरी झिरवळ, आदिवासी खासदार,आमदार,आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे,आदिवासी विकास आयुक्त, लीना बनसोड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) आयुक्त निलेश सागर यावेळी उपस्थित होते.

Tribal Hostel Limit Decision Cancels
हॉस्टेलवाले प्रेगन्सी टेस्ट करायला लावतात; आदिवासी मुलीने सांगितली हॉस्टेलमधील धक्कादायक बाब

शासकीय आदिवासी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आवश्यक सोयी-सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वसतिगृह व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी प्रवेश प्रक्रिया, सोयी-सुविधा, प्रशासकीय कार्यपद्धती, देखरेख व तपासणी याबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस पोषक वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री वूईके यांनी बैठकीत दिले.

वसतिगृह व्यवस्थेतील अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना सुविधा अधिक परिणामकारकपणे उपलब्ध करून देण्यात याव्यात. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून विद्यार्थीकेंद्रित, पारदर्शक आणि अधिक सक्षम वसतिगृह व्यवस्था निर्माण करण्यासाठी काम करण्याबाबतही मंत्री वूईके यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com