

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी आज पुण्यात छात्रों की गूंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यीनींशी संवाद साधला. यावेळी पुण्याच्या मांजरीत उपोषण करणाऱ्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधींना आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यासह आदिवासी हॉस्टेलमधील कडू सत्य जगासमोर मांडलं.
आदिवासी विभागाच्या पुण्यातील हॉस्टेलमध्ये गडचिरोली, नांदेड, अमरावती येथून विद्यार्थी येतात. ते दररोज घरी जाऊ शकत नाहीत. जर आम्ही दिवाळी किंवा इतर वेळी सुट्टीसाठी घरी जातात. मात्र जेव्हा परत आम्ही हॉस्टेलमध्ये परत येतो तेव्हा आमच्याकडून फिटनेस प्रमाणपत्र मागितलं जातं. यात आमची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, अशी धक्कादायक माहिती एका विद्यार्थिनीने दिलीय.
आदिवासी मुलींचे होस्टेल आहेत ते मुख्य शहरात नसून शहराच्या बाहेर आहेत. त्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी मोठा प्रवास करावा लागतो. मी आता जे निवेदन दिले आहे, त्याचा विचार करून आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी विनंती विद्यार्थिनीने केलीय. आमच्या भागात ज्या आश्रमशाळा असतात, तिथे सेंट्रल किचन पद्धत सुरू आहे. म्हणजे एका ठिकाणी जेवण बनवलं जाणार आणि ते 70-80 किमी लांब नेले जातं. त्यामुळे ते जेवण खराब होऊन विषबाधा होते.
पुण्यातील कार्यक्रमात खासदार राहुल गांधींशी संवाद साधताना आदिवासी विद्यार्थिनीने आश्रमशाळेतील वसतीगृहामधील समस्यांचा पाढा वाचला. त्याचबरोबर तिने आदिवासी कल्याण विभागाच्या मंत्र्यांना इशारा दिलाय. आदिवासी मुलं आपल्या मागंण्यासाठी मांजरीमध्ये आंदोलन करत आहेत.आम्ही आमच्या मागण्या आदिवासी विभागातील मंत्र्यांपुढे मांडल्या. माक्ष त्यावर त्यांनी सॉरी म्हणून उत्तर दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.