Palghar Tribal Ashram School : आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक घटना! पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

Tribal Ashram School Student Dies : मासवन येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Tribal Ashram School Student Dies :
Palghar Ashram School Student Dies, Raising Questions Over Student Safetysaam tv
Published On
Summary
  • आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

  • पालघर मासवन आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना

  • पालघर आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे सुरक्षेचा प्रश्न

रुपेश पाटील, साम प्रतिनिधी

गडचिरोलीमधील आश्रमशाळेच्या तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशानं मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजे असतानाच आता पालघरमधील आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. पालघर जिल्ह्यातील मासवन येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत एका विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडलीय. हाती आलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याची तब्येत बरी नव्हती. दरम्यान या घटनेमुळे राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

Tribal Ashram School Student Dies :
Rupali Chakankar: रुपाली चाकणकर बदनामी प्रकरण; दिपाली सय्यद, अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

श्रीयांश शैलेश आंबात असे मृत मुलाचे नाव आहे. श्रीयांश हा इयत्ता पहिलीमध्ये शिकत होता. दरम्यान मासवन येथील आश्रमशाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजलीय. गेल्या काही दिवसांपासून श्रीयांशला ताप येत असल्याची माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली. अवघ्या महिनाभरात याच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Tribal Ashram School Student Dies :
'आता मी जास्त काम करु शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला हवी'; गडकरींच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

दरम्यान, सध्या शाळेतील 26 विद्यार्थी तापाने आजारी असून त्यांच्यावर जवळच्या मासवन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत .एकाच शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजारपणाचे प्रमाण आणि महिनाभरातील दोन मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाने याची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तातडीने तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याप्रकरणी जयेश तासवी म्हणाले की, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलीला विचारलं की, विद्यार्थी आजारी का पडत आहेत, त्यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गार पाणी दिलं जातंय.पाणी गरम करण्याचं गिझर खराब झालंय. गेल्या तीन महिन्यापासून हीच स्थिती आहे. जे विद्यार्थी रुग्णालयात दाखल झालेत त्या सर्वांना ताप आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com