सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

maharashtra panel recommends withdrawal of 44 protest related cases : धार्मिक, सामाजिक आणि राजकीय आंदोलन प्रकरणांत दाखल ४४ खटले मागे घेण्याची शिफारस मंत्रिमंडळ उपसमितीने केली. राज्याचे मंत्री आणि या समितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.
सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे
Mumbai Mantralayasaam tv
Published On

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले ४४ खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव, अभियोग संचालनालयाचे संचालक, गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

यापूर्वी झालेल्या बैठकीत ७७ खटले मागे घेण्यात आले होते; तर आज ४४ खटले मागे घेण्याची शिफारस करण्यात आली. या समितीच्या बैठकीत पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या १३३ अर्जदारापैकी ४४ अर्जदारांवरील खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे स्त्रीविषयक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक व दिवाणी प्रकरणे ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकरणावरील खटले मागे घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.

मंत्रिमंडळ उपसमितीकडे प्राप्त १३३ अर्जदारांपैकी १४ अर्जांवर पुन्हा विचार करण्याची शिफारस करण्यात आली. ही प्रकरणे पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त क्षेत्रीय समितीपुढे ठेवण्यात येतील; तसेच ३५ प्रकरणांपैकी काही खटले निकाली निघाले होते, तर ३२ खटले हे समितीच्या कार्यकक्षेत न येणारे होते. आज आलेल्या खटल्यापैंकी केवळ ८ खटले प्रलंबित राहिले आहेत.

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे
Maharashtra Cabinet Meeting: फडणवीस सरकारचे ६ मोठे निर्णय, कोणत्या जिल्ह्यांना होणार सर्वाधिक फायदा?

सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, आंदोलक, विचारधारात्मक चळवळींतील सहभागी यांच्यावर विनाकारण खटले दाखल करण्यात आले होते. अशा अनावश्यक खटल्यांपासून त्यांची मुक्तता करणे; हे सरकारचे उत्तरदायित्व असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

आज मागे घेण्यात आलेल्या खटल्यांमध्ये गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, सामाजिक कार्यक्रम, गोवंश संरक्षण आंदोलन, कामगार आंदोलन अशा विविध खटल्यांचा समावेश आहे.

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे
Maharashtra Politics: ठाकरे गटातील फुटीमागे ना भाजप ना शिवसेना; 'ऑपरेशन टायगर' का घडलं? मोठं कारण आलं समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com