Maharashtra Fuel Shortage: इंधन टंचाईदरम्यान डिझेल खरेदीसाठी शासनाकडून नियम-अटी जाहीर; कोणा-कोणाला मिळणार डिझेल?

Maharashtra Fuel Shortage: महाराष्ट्रात डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ट्रॅक्टर आणि शेती यंत्रसामग्रीसाठी कॅनमधील डिझेल खरेदीवरील निर्बंध शिथिल केले असून, खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
Maharashtra Fuel Shortage:
MAHARASHTRA FUEL CRISIS: GOVERNMENT RELAXES DIESEL RULES FOR FARMERSsaam tv
Published On
Summary
  • राज्यात डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा.

  • प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी दिली.

  • ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध होणार.

खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतीची कामांची लगबग जोरात सुरू आहे. परंतु त्याचदरम्यान राज्यात इंधन टंचाई झाली आहे. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामे रखडली आहेत. डिझेलसाठी पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर आणि मोटारसायकलच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रांगा लागल्याचं चित्र सर्वत्र दिसत आहे.

राज्यात भयान चित्र तयार झाले आहे. यादरम्यान प्रशासनाने इंधन खरेदीबाबत एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. जालाना प्रशासनाने कॅनमध्ये डिझेल देण्यावरील बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर कृषी यंत्रांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध होणार आहे.

Maharashtra Fuel Shortage:
Petrol-Diesel Rate: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त;भारतात मात्र १० दिवसात तिसऱ्यांदा वाढले दर

खरीप हंगामाची लगबग सुरू पेरणीपूर्व मशागत आणि इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अशावेळी प्रशासनाने अचानक कॅनमध्ये इंधन भरण्यास बंदी घातल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले होते. डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर थेट पेट्रोल पंपावर न्यावे लागत होते. अनेक गावांमधून पेट्रोल पंप दूर असल्याने वेळ, अतिरिक्त इंधन आणि मजुरीचा खर्च वाढलाय. त्यामुळे शेतीकामांवर थेट परिणाम होतोय.

Maharashtra Fuel Shortage:
Petrol Diesel Price Today : पेट्रोल डिझेलच्या किमतीत दहा दिवसात तिसऱ्यांदा वाढ, सर्वसामान्यांना मोठा फटका; आजचा दर किती ? जाणून घ्या

पंपावर लागल्या होत्या वाहनांच्या रांगा

कॅन बंदी लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा येथील एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्यांच्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर नव्हते किंवा शेतापर्यंत डिझेल नेण्याची सुविधा नव्हती, अशा शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली होती. या परिस्थितीमुळे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

शासनाने अवघ्या दोन दिवसांत निर्णय बदलला

डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढू लागला. शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केल्याने प्रशासनाने अवघ्या दोन दिवसांत आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता पुन्हा कॅनमध्ये डिझेल देण्यास परवानगी देण्यात आली. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'या' अटी पाळाव्याच लागणार

डिझेल खरेदीसाठी काय असणार अटी?

इंधनाचा गैरवापर आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर अटी लागू केल्या आहेत.

डिझेल घेण्यासाठी कागदपत्रे लागणार आहेत

ट्रॅक्टरचे आरसी बुक आवश्यक असेल

अॅग्रीस्टॅक आयडी सादर करावा लागेल.

अॅग्रीस्टॅक नसल्यास स्वतंत्र नोंद वहीत माहिती नोंदवली जाणार

आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी देणे अनिवार्य असणार आहे.

पेट्रोल पंप चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.

गैरवापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

कॅनमध्ये मिळणाऱ्या इंधनाचा गैरवापर किंवा अनधिकृत विक्री आढळल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांवर अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 02482-225311 किंवा 8888125312 या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन जालना प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com