Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?

Drought Compensation Rates: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारी दुष्काळाची आर्थिक मदत वाढण्याची शक्यता आहे.
Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?
Good News For FarmersSaam Tv
Published On: 
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुष्काळाची आर्थिक मदत वाढली

  • जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ५०० रुपये मदत मिळण्याची शक्यता

  • दुष्काळी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळणार

  • बागायती आणि बहुवार्षिक पिकांच्या मदतीत किती वाढ होणार

अपुरा पाऊस आणि अल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. दुष्काळाची आर्थिक मदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर एनडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या जिरायती पिकांसाठी मिळणाऱ्या ८ हजार ५०० रुपयांच्या मदतीऐवजी १३ हजार ५०० रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष मदत किती मिळणार? हे केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना आणि राज्य शासनाच्या पुढील आदेशावर अवलंबून असणार आहे. जर नवीन आर्थिक मदत लागू झाली तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतकरी सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांची प्रतीक्षा करत आहेत.

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

दुष्काळी मदतीची सध्याची रक्कम किती आणि किती वाढण्याची शक्यता आहे याची माहिती समोर आली आहे. जिरायती पिकांसाठी सध्या प्रतिहेक्टर ८५०० रुपये मिळत आहेत. नवीन आर्थिक मदत १३,५०० रुपये मिळू शकतो. बागती पिकांसाठी सध्या १७००० रुपये मिळतात. ते २३००० रुपये होण्याची शक्यता आहे. तर बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये सध्या मिळतात ते २५००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?
Maharashtra Drought: दुष्काळासंदर्भात मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, शासन निर्णय उद्याच काढणार

यावर्षी राज्यात खूप कमी पाऊस पडला. त्यात अल निनोच्या प्रभावामुळे शेत पिकांना मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. पाऊस नसल्याने पिकं करपून गेली. सध्या राज्यात नुकसानीचे प्रमाण ३३ टक्क्यांवर आहे. पिकांचे नुकसान झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून मदत करण्यात येते. यामध्ये केंद्राचा वाटा ७५ टक्के आणि राज्याचा २५ टक्के असतो. मदतीचे निकष केंद्राकडून निश्चित केले जातात. राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शेतकऱ्यांनी भरीव मदतीची अपेक्षा केली.

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com