राज्यात कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारची तीन पथके राज्यात दाखल झाली होती. या पथकांनी सोलापूर, अहिल्यानगर, जालना, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि वाशिम जिल्ह्यांतील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि जनावरांच्या चाऱ्याबाबत माहिती घेण्यात आली.
यासंदर्भात आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. राज्य सरकारने सादर केलेल्या प्राथमिक अहवालातील बाबींवर केंद्रीय पथकाने सकारात्मक भूमिका घेतल्याचे भरणे यांनी सांगितले. तसेच केंद्रीय कृषिमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही मदतीबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान, पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ७५ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा अंतिम अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येईल. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि शिवराज सिंह चौहान यांनी मदतीचे आश्वासन दिले असून, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही भरणे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.