

राज्यामध्ये यावर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नाही त्यामुळे दुष्काळी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पाणी नसल्यामुळे शेतातील पिकं करपून गेली. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे गावागावात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यंदाच्या दुष्काळाने १९७२ च्या दुष्काळालाही मागे टाकले. सुपर अल निनोमुळे रब्बी हंगामात इतिहासातील सर्वात नीचांकी पेरण्या झाल्या आहेत. रब्बी हंगामात केवळ साडे चौदा लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात. डिसेंबर अखेर २५ लाख हेक्टरवरही पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. १९७२ च्या दुष्काळातही राज्यात ४० लाख २९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.
राज्यात यंदा खरीपणानंतर रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. यंदा रब्बी हंगामात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात नीचांकी पेरण्या झाल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारीतून उघड झालं आहे. महाराष्ट्रात सरासरी ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त पेरणी होते. मात्र यंदा सुपर अल निनोमुळे पडलेल्या दुष्काळात केवळ १४ लाख २९ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षा जास्त भयाण ठरण्याची शक्यता आहे.
रब्बीचं सरासरी पेरणी क्षेत्र - ६० लाख हेक्टर
१९७२-७३ मध्ये ४७.२९ हजार हेक्टरवर पेरण्या
१९९१-९२ मध्ये दुष्काळात ४०.३९ हेक्टरवर पेरण्या
२०११-१२ मध्ये ४७.४९ लाख हेक्टरवर पेरण्या
२०१२-१३ मधील दुष्काळात ४७.६२ हेक्टरवर पेरण्या
२०१८-१९ मधील दुष्काळात ४८.१७ हेक्टरवर पेरण्या
यंदा २०२५-२६ मध्ये ६७.५७ लाख हेक्टरवर पेरण्या
अन्नधान्य पिके: ७ लाख ७९ हजार ८१२ हेक्टर
कडधान्य: ६ लाख ७८ हजार ३८५ हेक्टर
तेलबिया: १६ हजार १०६ हेक्टर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.