Maharashtra Drought : शेतकऱ्यांना दिलासा! आणखी ४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

Maharashtra Drought Government Update News : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिंडोरी, चिपळूण, वाडा आणि विक्रमगड या आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.
Maharashtra Drought News
Maharashtra Drought News AI image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र सरकारने आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंजुरी दिली.

  • नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा समावेश.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित.

  • पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड तालुक्यांचाही समावेश.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा अनेक भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. कमी पावसाचा परिणाम शेतीवर झाला असून शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने आणखी चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचे सांगितले जात आहे. पाऊस कमी झाल्याने पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर केला होता. सुरुवातीला राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला होता. यानंतर सरकारने आणखी ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या ३०५ वर पोहोचली होती. आता या यादीत पुन्हा चार तालुक्यांची भर पडली आहे.

Maharashtra Drought News
Plane Crash : हवेतच विमानाला आग, क्षणांत जमिनीवर कोसळून मोठा स्फोट; विमान दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

नवीन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, पालघर जिल्ह्यातील वाडा आणि विक्रमगड या चार तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित चार तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यास मान्यता देण्यात आली.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या आता ३०८ झाली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत आणि इतर सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.