काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Maharashtra Congress : महाराष्ट्र काँग्रेसने विदर्भात संघटनात्मक फेरबदल करत ज्येष्ठ नेते पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केलीय. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार २४ ऑक्टोबर रोजी नियुक्तीपत्र जारी करण्यात आले.
Pankaj Guddewar appointed in-charge district president by Maharashtra Congress
Pankaj Guddewar appointed in-charge district president by Maharashtra Congress
Published On: 
Summary
  • महाराष्ट्र काँग्रेसने विदर्भात संघटनात्मक फेरबदलाला सुरुवात केली

  • ज्येष्ठ नेते पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

  • काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी नियुक्तीपत्र जारी केलं.

शिक्षक व पदवीधर मतरदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र काँग्रेस पक्षात फेरबदल करत आहे. या नव्याने होत असलेल्या फेरबदलाची सुरुवात विदर्भापासून केलीय. काँग्रेस पक्षाने येथील प्रभारी जिल्हाध्यक्षाची नियुक्ती केलीय. ज्येष्ठ नेते पंकज गुड्डेवार यांची काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आलीय. काँग्रेस पक्षाने हा आदेश शनिवारी (दि.२४) दुपारी जारी केला. काँग्रेसचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेश पाटील यांनी गुड्डेवार यांच्या नियुक्तीचे पत्र जारी केलं. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे हे त्यांच्या आश्रमशाळेत झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी सध्या कारागृहात आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसने पंकज गुड्डेवार यांची प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Pankaj Guddewar appointed in-charge district president by Maharashtra Congress
Maharashtra Politics: ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग! अंबरनाथमधील भाजपचे सर्व नगरसेवक थेट शिंदेंच्या बंगल्यावर, राजकीय भूकंप होणार? चर्चांना उधाण

पंकज गुड्डेवार हे विद्यार्थी दशेपासूनच काँग्रेस पक्षाशी जोडल्या गेले आहेत. १९९८ मध्ये ते एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष झाले. त्यानंतर २००१ ते २००६ पर्यंत त्यांनी एनएसयूआयचे राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यानंतर ते युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. त्यानंतर निवडणुकीद्वारे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, काँग्रेसचे जिल्हा सचिव अशा विविध पदांची जबाबदारी त्यांनी संभाळलीय.

Pankaj Guddewar appointed in-charge district president by Maharashtra Congress
आधी 8 आमदार भाजपात, आता 3 सत्ताधारी पक्षात; पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप

विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पक्ष निरीक्षक म्हणूनही काम केलंय. २०२० पासून ते काँग्रेसचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत. आता पक्षाच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. गुड्डेवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे पक्षाची धुरा आल्याने पक्ष बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com