आधी 8 आमदार भाजपात, आता 3 सत्ताधारी पक्षात; पश्चिम बंगालनंतर आणखी एका राज्यात राजकीय भूकंप

Meghalaya Politics: मेघालयात UDP पक्षाला मोठा धक्का बसलाय. आठ आमदार भाजपमध्ये, तर तीन आमदार सत्ताधारी NPP मध्ये दाखल झाले आहेत. तीन आमदारांच्या विलीनीकरणाला विधानसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे.
Meghalaya Political Crisis: 8 UDP Mlas Join Bjp, 3 Merge With Npp
Meghalaya Political Crisis: 8 UDP Mlas Join Bjp, 3 Merge With Nppsaamtv
Published On: 
Summary
  • मेघालयातील युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी (UDP) मध्ये मोठी फूट पडली.

  • UDP चे आठ आमदार भाजपमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे.

  • आणखी तीन आमदार सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये (NPP) विलीन

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर मेघालयातील एक पक्ष फुटलाय. या पक्षातील काही आमदार भाजपमध्ये गेलेत, तर काही आमदार सत्ताधारी पक्षात गेले असून विधानसभेचे अध्यक्ष थॉमस ए. संगमा यांनी याला मंजुरीही दिलीय. युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीच्या (UDP) तीन आमदारांनी सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये दाखल झाले असून या विलीनीकरणाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिलीय. याआधी काही दिवसांपूर्वीच UDP चे आठ इतर आमदार भाजपमध्ये सामील झाले होते, ज्यामुळे आता विधानसभेत UDP चा केवळ एकच आमदार उरलाय.

आमदाराच्या विलीनीकरणाला मान्यता देताना अध्यक्ष म्हणाले की, त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील परिच्छेद ४ अंतर्गत, 'नॅशनल पीपल्स पार्टी' (NPP) मध्ये त्यांच्या विलीनीकरणाला मान्यता दिलीय. त्यांना मेघालय विधानसभेत या ३ आमदारांना 'नॅशनल पीपल्स पार्टी'चे सदस्य म्हणून जागा देण्यात येणार आहे.

१७ ऑक्टोबर रोजी या तिन्ही व्यक्तींनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कळवले की, त्यांनी एनपीपी (NPP) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी असेही नमूद केलय की, विधानसभेतील यूडीपी विधिमंडळ पक्षाच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान दोन-तृतीयांश सदस्य ते आहेत.

Meghalaya Political Crisis: 8 UDP Mlas Join Bjp, 3 Merge With Npp
Maharashtra Politics: ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग! अंबरनाथमधील भाजपचे सर्व नगरसेवक थेट शिंदेंच्या बंगल्यावर, राजकीय भूकंप होणार? चर्चांना उधाण

विधानसभेच्या अध्यक्षानुसार, अध्यक्षांनी तिघांनाही त्यांच्या पत्रातील मजकुराची स्वतः खात्री करण्यास सांगितले होते. १९ ऑक्टोबर रोजी, त्यांनी अध्यक्षांसमोर उपस्थित राहून आपल्या पत्राची पुष्टी केली आणि विलीनीकरणाचा आपला निर्णय पुन्हा एकदा स्पष्ट केलाय. विधानसभा अध्यक्ष म्हणालेत की, "त्यांनी स्वेच्छेने आणि स्वतःच्या मर्जीने 'नॅशनल पीपल्स पार्टी'मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. याबद्दल मी समाधानी आहे."

Meghalaya Political Crisis: 8 UDP Mlas Join Bjp, 3 Merge With Npp
माईकची तोडफोड, फाईल्स फेकल्या; प्रदुषणाच्या चर्चेवेळी महानगरपालिकेत नगरसेवकांमध्ये तुफान हाणामारी

ही नवीन घडामोड १६ ऑक्टोबर रोजी दिलेल्या एका आदेशानंतर घडलीय. याद्वारे युडीपीच्या (UDP) आठ आमदारांचे भाजपमध्ये झालेले विलीनीकरण अधिकृतपणे मान्य करण्यात आले होते. या दोन्ही विलीनीकरणांना मान्यता मिळाल्यामुळे मेघालय विधानसभेच्या ६० सदस्यांच्या सभागृहात युडीपीच्या आमदारांची संख्या १२ वरून थेट एकावर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com