Maharashtra Politics: ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग! भाजपचे सर्व नगरसेवक थेट शिंदेंच्या बंगल्यावर; उपमुख्यमंत्री शिंदे मोठा डाव टाकण्याच्या तयारीत?

Mahayuti Politics: अंबरनाथमध्ये भाजप आणि शिंदे गटातील मतभेदांच्या चर्चांदरम्यान भाजप नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय. नगरपालिका सत्तासमीकरणात बदल होणार का?
Ambernath Politics: Bjp Councillors Meet Ekanath Shinde Amid Power Shift Buzz
Ambernath Politics: Bjp Councillors Meet Ekanath Shinde Amid Power Shift Buzzsaam tv
Published On: 
Summary
  • अंबरनाथमधील भाजप नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला का गेले?

  • अंबरनाथ नगरपरिषदेतील सध्याचे राजकीय संख्याबळ काय?

  • महायुतीतील मतभेदांमुळे अंबरनाथच्या राजकारणात काय बदल होणार?

गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधील भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापलंय. त्याचं झालं असं भाजपचे सर्व नगरसेवक थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे सत्ता बदलच्या चर्चांना उधाण आलंय. ही सत्ता बदलाचे संकेत राज्यातील सरकारचे नाही तर अंबरनाथ नगरपालिकेतील आहेत.

अंबरनाथ नगरपालिकेत सध्या भाजपचा नगराध्यक्ष आहे. पण नगरसेवकांचे संख्याबळ पाहता शिवसेना शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथमध्ये स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा होत्या.

Ambernath Politics: Bjp Councillors Meet Ekanath Shinde Amid Power Shift Buzz
ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) पाठिंबा शिवसेनेला असल्याने सत्ता समीकरणांची गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचदरम्यान ही घडामोड घडलीय. अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजस्वी कर्जुले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झालेत. या भेटीमुळे अंबरनाथच्या स्थानिक राजकारणात मोठ्या राजकीय उलटफेरांच्या आणि सत्ता बदलाच्या चर्चांना उधाण आलंय.

Ambernath Politics: Bjp Councillors Meet Ekanath Shinde Amid Power Shift Buzz
नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

नगराध्यक्ष तेजस्वी कर्जुले आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांनी ठाण्यात जाऊन थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. भाजप नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार की केवळ स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवरून आणि सत्ता समन्वयासाठी ही भेट झाली, याबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.

शिवसेनेचे अधिक संख्याबळ आणि अजित पवार गटाची साथ यामुळे नगरपालिकेत सत्ता बदलाच्या हालचालींना वेग आलाय. ठाण्यातील या महत्त्वपूर्ण भेटीनंतर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात. अंबरनाथच्या राजकारणात खरोखरच मोठा भूकंप होतो का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com