ऐन निवडणुकीच्या काळात भाजपला मोठा धक्का! माजी खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Rajyasabha Election : भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्या ‘टाटा-बाय बाय’ पोस्टने राजकीय खळबळ उडाली आहे. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
Rajyasabha Election
Bjp Rajya Sabha List Sparks Discontent; Dharmendra Kashyap’s “Tata-bye Bye” Post Creates Buzzsaam tv
Published On: 

भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षात नाराजीचे सूर उमटू लागलेत. बरेलीचे भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वातावरण तापलंय. खासदारानं आपल्या फेसबूकवर टाटा-बाय-बाय अशी पोस्ट केली. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठं वादळ उठलंय.

हे माजी खासदाराचं नाव आहे धर्मेंद्र कश्यप. धर्मेंद्र कश्यप यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर "टाटा-बाय-बाय" (Tata-Bye-Bye) अशी पोस्ट केलीय. ही पोस्ट व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा संदेश समोर येताच त्यांच्या निवासस्थानी समर्थक आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे.

राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यामुळे नाराज झालेले धर्मेंद्र कश्यप यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतलाय. ते लवकरच दुसऱ्या पक्षात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू झालीय. त्यांनी फेसबूकवर लिहिलेल्या पोस्टचा हाच अर्थ आहे का काही वेगळा याचे तर्कवितर्क काढले जात आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार ते लवकरच समाजवादी पक्ष किंवा अन्य एखाद्या प्रमुख राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन ते त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतील , अशी चर्चा आहे.

Rajyasabha Election
नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

मुलीला राजकारणात आणण्याची तयारी?

कंधरापूर येथील धर्मेंद्र कश्यप अनेक दिवसापासून राजकारणात सक्रीय आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ते त्यांची मुलगी किर्ती कश्यप यांचं राजकारणात पदार्पण करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ते किर्ती कश्यपच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी खूप राजकीय फिल्डिंग लावली होती. परंतु त्यांच्या हाती निराशा आल्यानं ते नाराज असून त्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारची पोस्ट केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

बसपा ते सपा आणि अखेरीस भाजप असा प्रवास

धर्मेंद्र कश्यप हे आधी २००२ मध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००३ मध्ये ते समाजवादी पक्षात (सपा) सामील झाले आणि त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. ते आंवला (बरेली) मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

Rajyasabha Election
भाजपला निवडणुकीआधी मोठा धक्का; केंद्रातील मित्रपक्षानं सोडली साथ, दुसऱ्या पक्षाशी बांधली युतीची गाठ

भाजपच्या उमेदवार मनेका गांधी यांनी त्यांचा थोड्या फरकाने पराभव केला होता. पुढे ते भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले. २०१४ व २०१९ अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले. दरम्यान ते २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहिले. त्यावेळी त्यांचा समाजवादी पक्षाचे उमेदवार नीरज मौर्य यांनी १५,९७० मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत पराभूत झाल्यापासून ते आपल्या मुलीला राजकारणात पदार्पण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com