नवीन राजकीय समीकरण! भाजपचं टेन्शन वाढलं, इंडिया आघाडीत आणखी एका पक्षाची एन्ट्री; राहुल गांधींसोबतच्या बैठकीनंतर घोषणा

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांचा पक्ष 'इंडिया' (INDIA) आघाडीत सामील होणार असल्याचं मौर्य यांनी जाहीर केलंय.
Swami Prasad Maurya party joins INDIA alliance 2026
Swami Prasad Maurya party joins INDIA alliance 2026saam tv
Published On: 
Summary
  • स्वामी प्रसाद मौर्य यांनी राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली.

  • भेटीनंतर मौर्य यांच्या पक्षाचा INDIA आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 च्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेसनं भाजपला चीतपट करण्यासाठी सर्व रणनीती आखली असून नवनवीन आघाड्या करत आहे. याचदरम्यान, 'अपनी जनता पार्टी'चे अध्यक्ष आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मौर्य यांनी मोठा निर्णय घेतलाय.

स्वामी प्रसाद मौर्य हे त्यांचा पक्ष 'इंडिया' (INDIA) आघाडीत सामील होणार असल्याची घोषणा केलीय. आता त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशमधील निवडणूक या आघाडीच्या भागीदारीने लढवेल. मात्र, जागावाटप किंवा निवडणूक रणनीतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Swami Prasad Maurya party joins INDIA alliance 2026
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर, स्वामी प्रसाद मौर्य यांनी इंडिया आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान भविष्यातील रणनीती आणि आपला पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार, यावर नंतर चर्चा केली जाणार असल्याचं मौर्या यांनी सांगितले. "भाजपला सत्तेतून हटवणे, देशाला वाचवणे आणि संविधान वाचवणे" हे आपले उद्दिष्ट असल्याचे मौर्य यावेळी म्हणाले.

Swami Prasad Maurya party joins INDIA alliance 2026
Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राहुल गांधींच्या राजकीय उपक्रमांचा संदर्भ देताना स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, राहुल गांधी देशभरातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि अल्पसंख्याकांचा आवाज उठवत आहेत. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेशात त्यांचा स्वतःचा पक्षही या घटकांशी संबंधित मुद्द्यांवर काम करत आहे. त्यामुळे आपला अपनी जनता पार्टी सामायिक विचारसरणीच्या आधारे 'इंडिया' (INDIA) आघाडीसोबत मिळून निवडणुका लढवेल.

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस हाच एकमेव पर्याय

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस हा एकमेव पर्याय असून याच विचारातून 'इंडिया' (INDIA) आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. बैठकीदरम्यान या आघाडीबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. समान विचारसरणीचे पक्ष आणि नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही बैठकांच्या मालिकेची सुरुवात असल्याचे त्यांनी सूचित केले. भविष्यातील राजकीय उपक्रमांबाबतची माहिती योग्य वेळी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

बसपा-समाजवादी पक्षासोबत होती युती

स्वामी प्रसाद हे बसपा (BSP) आणि सप (SP) या पक्षांशी संबंधित राहिले आहेत.स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजकीय प्रवास अनेक पक्षांतून झाला आहे. ते दीर्घकाळ बहुजन समाज पक्षात सक्रिय होते. मायावतींच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री तसेच विरोधी पक्षनेतेपद भूषवले.

त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले. २०१७ मध्ये भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर, ते योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा भाग होते.नंतर त्यांनी भाजप सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला, परंतु तिथेही मतभेद निर्माण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com