शिंदेसेनेचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला; मराठीची सक्ती, भाजपला यूपी निवडणुकीची भिती?

One-Year Marathi Learning Extension for Auto Drivers Sparks Political Row: मुख्यमंत्र्यांनी अमराठी रिक्षाचालकांसंदर्भात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची...अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 105 दिवसाची मुदतवाढ परिवहन मंत्र्य़ांनी दिलेल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी चक्क 1 वर्षांची मुदतवाढ दिलीय...त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी काय टीका केलीय.. पाहूयात या रिपोर्टमधून...
Maharashtra CM one year extension for non-Marathi auto taxi drivers to learn Marathi
Maharashtra CM one year extension for non-Marathi auto taxi drivers to learn Marathisaam tv
Published On

महाराष्ट्रात अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला मराठी सक्तीचा निर्णय़ भाजपला रुचलेला नव्हता हे अखेर सिद्ध झालंय. कारण मुख्यमंत्र्यांनी आपली पॉवर वापरून परप्रांतीयांना मराठी शिकण्यासाठी थेट १ वर्षाची मुदत वाढवून दिलीय. आता मराठीसक्तीसाठी सुरू केलेल्या धडक कारवाईला अखेर ब्रेक लागलाय. मात्र यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेसेनेला शह दिल्याची जोरदार चर्चा रंगलीय..... प्रताप सरनाईक यांनी मात्र मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य केला असला तरी त्यांच्या परीनं मराठीसक्तीबाबत पुन्हा एकदा ठाम भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला.

मराठीसक्तीविरोधात परप्रांतीय भैय्यांनी मोठी आदळआपट केली होती. रास्ता रोको आणि संपाचा ड्रामाही केला होता. याचे पडसाद आगामी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची भीती भाजपला होती. आणि त्यामुळेच ही ही दीर्घ मुदतवाढ दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

मुळात परिवहन विभागानं मराठी शिकण्यासाठी 105 दिवसांची मुदत दिली होती... तरीही अनेक रिक्षाचालकांनी मराठी न शिकण्याची भूमिका घेत मुजोरी दाखवली.. अनेक अमराठी रिक्षाचालकांनी मराठी शिकवणीला उस्फुर्त प्रतिसाद दिला. त्यांनी मराठी बोलणंही सुरू केलं. जर त्यांना शिकून जुजबी मराठी बोलता येत असेल तर इतरांना का जमत नाही? हा खरा प्रश्न आहे. आता १ वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी ती कायमची मुदतवाढ ठरू नये एवढंच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com