छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथील राजकोट किल्ला प्रांगणात कोसळला. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक आज रात्री 10:30 वाजता वर्षा बंगल्यावर होणार आहे.
कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शाहू महाराज राजकोट किल्ल्यावर भेट देत आहेत.
भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर आज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. बीडच्या केज तालुक्यातील दहिफळ वडमावली येथून केजकडे जात असताना हा प्रकार घटला.दगडफेकीत माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह चालक किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांकडून घटनेची दखल घेतली असून अज्ञातांचा शोध घेण्यात येत आहे.
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर ईडी ने कारवाई केली होती. अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (ABIL) चे कॉर्पोरेट कार्यालय असलेल्या एआरए मालमत्तेची चार कोटी रुपयांची जमीन ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली होती.
मुंबई गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सोहेल साळुंके राहणार कळवा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोहेल हा कळवा येथून रत्नागिरीकडे जात असताना कशेडी घाटात चोळई गावचे हद्दीत अपघात घडला. कशेडी घाटातील वळणावर दुचाकी स्लीप झाली आणि मागून येणाऱ्या गाडीच्या चाकाखाली दुचाकीस्वास सापडला.
हर्षवर्धन सपकाळ यांची राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या तोंडावरकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.
उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचं प्रकरण गेल्या एक वर्षापासून महापालिकेत चर्चेत आहे. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात रिजॅाईंडर दाखल केलं. पूजा खेडकरने UPSCचे सर्व आरोप फेटाळले आहेत. UPSCच्या आरोपात तथ्य नसल्याचं पूजा खेडकरचे म्हणणं आहे. पूजा खेडकरनं नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप UPSCने केला होता.
केंद्रीय पियूष गोयल यांनी दिघी प्रकल्पावर मोठं भाष्य केलं. 'दिघीचा प्रकल्प पुढील 3 वर्षात पूर्ण होईल. महाराष्ट्र सरकारचं आम्हाला मोठं सहकार्य असणार आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केलं आहे की, ते सहकार्य करतील, असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले
पुण्यात नळ स्टॉप चौकात विश्व हिंदू महासंघाने आंदोलन केले आहे.
काही वेळ रस्ता रोको आंदोलन केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटमधील पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात आंदोलन
- आदिवासी आंदोलनादरम्यान आंदोलक महिलेला आली भोवळ
- महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला खांद्यावर उचलून नेले रुग्णालयात
- भोवळ आलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात केलं दाखल
- पेसा भरतीसाठी आज नाशिकमध्ये सुरूय आदिवासी बांधवांचे आंदोलन
पुणे जिल्ह्यातील पुरामुळे 236 घरांची पडझड पाहायला मिळत आहे. पुणे शहरासह हवेली,मुळशी आणि पिंपरी चिंचवड भागात जुलै अखेर झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबाचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठाने घरांची पडझड झाली आहे. त्याची महसूल विभागाने पंचनामे केली आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बदलापूरमध्ये मनसेच्या महिला पदाधिकारी आणि आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या पालकांशी संवाद साधला. यानंतर पोलिसांशीही त्यांनी चर्चा केली.
हिंगोलीत शासकीय काम करत नसल्याने तरुणाने तलाठ्याला चाकूने भोसकले.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगावमध्ये चाकू हल्ल्यात तलाठी जागीच मृत्यू
तलाठी कार्यालयात तलाठ्याचा घेतला जीव
- नाशिक मुंबई महामार्गावर भर रस्त्यात टँकर उलटला.
- टँकर रस्त्यात आडवा झाल्याने नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासांपासून खोळंबली
- गोंदे ते पाडळी फाटा अशी मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक वळवली.
- रूट पेट्रोलिंग टीम व महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल
- टँकर हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू
पुण्यातील चार दिवसापासून बंद असलेला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. यामुळे नदीपात्रातील वाहतूक सुरळीत होणार आहे. खडकवासला धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला होता. विसर्ग कमी केल्यानंतर भिडे पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
नाशिक मुंबई महामार्गावर भर रस्त्यात टँकर पलटी झालाय. टँकर रस्त्यात आडवा झाल्याने नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासांपासून खोळंबली आहे. गोंदे ते पाडळी फाटा अशी मुंबई नाशिक महामार्गावरून वाहतूक वळविली गेलीय. रूट पेट्रोलिंग टीम आणि महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. टँकर हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
शिवप्रेमींनी आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलाताना केलंय. तर किल्ल्यावर राडा करणारे शिवद्रोही असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
अमरावती जिल्ह्यातील चार लाख पेक्षा जास्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिला पात्र आहे तर जवळपास 60 टक्क्याहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे मात्र अनेक लाडक्या बहिणीचे बँक खात्यास आधार लिंक नसल्याने ही योजना केवायसी च्या फेऱ्यात अडकली आहे अशा महिलांनी आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार केंद्रावर मोठी गर्दी केली आहे सध्या अमरावती शहरासह ग्रामीण भागात आधार केंद्रावर आधार बँकेला लिंक करण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहे ज्यांचे केवायसी आधार कार्ड लिंक झाले अशाच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव येथे शेततळ्यात पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. संभाजीनगर तालुक्यातील आडगाव परिसरात गेल्या तीन दिवसापासून लाईट नसल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्न बिकट झाला होता. आज एका शेतकऱ्याचा शेततळ्यातुन पाणी काढतं असताना शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर आडगाव येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मृत्यूला महावितरण कारणीभूत आहे, असा आरोप करीत गावातील शेतकऱ्यांनी मृतदेह घेऊन महावितरणच्या कार्यालय गाठले. जोपर्यंत शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्हीच मारणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे..
Solapur Latest News : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मध्ये लेडी सिंघम पोलीस अधिकाऱ्याकडून रोड रोमियो, टवाळ खोर तरुणांना पोलीस काठीचा प्रसाद बसला आहे. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शाळा, महाविद्यालये आणि बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या रोड रोमीयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
सांगोला बस स्थानकात ग्रामीण भागातून विविध शाळा आणि महाविद्यालयात शेकडो मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात. गावाकडे जाण्यासाठी एसटीला वेळ लागत असल्याने बस स्थानकात बसल्यानंतर अनेक टवाळ खोर तरुण त्या ठिकाणी बसून असतात, छेड काढतात,फेऱ्या मारतात. याचा त्रास या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींना होतो.
सांगोला पोलीस स्टेशन मधील दामिनी निर्भया पथकाच्या पोलीस उप निरीक्षक रुपाली उबाळे या लेडी सिंघम महिला अधिकाऱ्याने बस स्थानकात बसणाऱ्या रोड रोमियोना शोधून पोलिसी खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुलींची छेड काढण्याच्या त्रास देण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. पोलीस सोबत असल्याने मुली मध्ये आता सुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.
solapur latest News : माजी सनदी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. गुडेवार यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केलीय. निवडणुकीच्या चाचपणीच्या दृष्टीने ते सोलापुरातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या भेट ही घेत आहेत. 2013 साली चंद्रकांत गुडेवार हे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. विविध निर्णयामुळे त्यांची सोलापुरातील कारकीर्द ही वादळी ठरली होती. तसेच त्यांनी सोलापुरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता देखील मिळवली. हेच विचार घेऊन सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी सुरु केलीय. यासाठी भाजपकडून तिकीट मिळावे म्हणून देखील ते प्रयत्न करतायत. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सुटणार का? त्यात ही प्रस्थापित भाजप नेत्यांना डावलून गुडेवार यांना तिकीट मिळणार का हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी व फळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे आणि भाजी विक्रेत्यांचे मोबाईल गर्दीचा फायदा घेत चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शहबाज शेख आणि इरफान शेख अशी आहेत. या दोघांवर याआधीही मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून सहा मोबाईल आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
धाराशिव - तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी सीआयडीचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय. त्यामुळे आरोपींवर आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागृति समितीने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.त्यानंतर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस काढत गुन्हे दाखल करण्याविषयी विचारणा केली होती. मात्र वारंवार मागणी करूनही गृह खात्याकडून तपास करूनही तपासाचा अहवाल मिळाला नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आता या प्रकरणातील सीआयडीने केलेल्या चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याने भ्रष्टाचारांवर गुन्हे दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याच आता जिल्हाधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तर यासंदर्भातील कायदेशीर सल्ला आम्ही घेत आहोत असं जिल्हाधिकारी सांगितलय.
Nahsik News : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण 93 टक्के भरल्याने आणि येणाऱ्या पाण्याचा येवा पाहता गिरणा धरणाचा एक दरवाजा 30 सेंटी मीटरने उघडण्यात आला असून धरणातून 1188 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सुरू झाला आहे,यंदा धरण उशीरा भरले असले तरी धरण भरल्याने जळगाव जिल्हा व मालेगाव, नांदगाव तालुक्याचा पाणी प्रश्न त्यामुळे सुटला असून रब्बीच्या सिंचनाचा प्रश्न धरण भरल्याने सुटणार आहे,धरण भरून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदी काठच्या नगरिकांना सावधानतेचा इशारा देन्यात आला आहे
धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि पिक कर्जाचे टार्गेट पूर्ण न करणाऱ्या सात बँकेच्या मॅनेजर वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पालकमंञी तानाजी सावंत यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानंतर जिल्ह्यातील बँकेचा तपासणी अहवाल आल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सहायक निबंधक आशाबाई कांबळे यांच्या तक्रारी नुसार कलम 223 व 188 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडीची मातोश्रीवर बैठक सुरु झाली आहे. शरद पवार आणि नाना पटोले दाखल झाले आहेत.
लातूरच्या महाळुंगरा पाटी येथे मराठा तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षणाविषयी निवेदन देत जोरदार घोषणाबाजी केली होती आता पुन्हा चाकूर मध्ये ही मराठा समाज आक्रमक होत .,अजित पवार यांच्यासमोर मराठा आरक्षणाविषयी जोरदार घोषणाबाजी केली आहे... एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्यात. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका जाहीर करावी अशी मागणी देखिल करण्यात आली. तसच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबन प्रकरणी योग्य ती कारवाई करून महाराष्ट्राला साजेसा पुतळा तिथे उभा करावा या प्रमुख मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला होता...
पुण्यातील हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या मुलीचा शिक्षकाकडूनच विनयभंग करण्यात आला.
हडपसर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ( पॉक्सो ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शिक्षकाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे
२६ ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने दिली होती फिर्याद मुलगी घरी रडत आल्यावर मुलीने सांगितलं घडला प्रकार
Pune News : भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात भाग्यश्री नवटक्के यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल. गृह विभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बी एच आर या पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यात 2021 मध्ये गुन्हा दाखल होता. पुणे पोलिसांच्या EOW विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून भाग्यश्री नवटके त्यावेळी कार्यरत होत्या.
Ajit Pawar : लातूरच्या महाळुंगरा पाटी येथे मराठा तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा आरक्षणाविषयी निवेदन देत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्यात. यावेळी निवेदन देत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली आहे.
Shirdi : कोपरगावमधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्या सोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार महायुतीत आल्याने कोपरगाव मतदारसंघात कोल्हे कुटुंबीयांची राजकीय अडचण झाली आहे. विवेक कोल्हे यांनी शरद पवारांसोबत प्रवास केल्याने कोल्हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेऊ अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांच्या भेटीनंतर विवेक कोल्हे यांनी दिलीये. विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी..
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन १२५ चा प्लॅन आखला आहे.
राज्यातील ५० जागा भाजपने निश्चित केल्या आहेत, या जागांवर भाजप सहज निवडून येऊ शकतात
मात्र, इतर ७५ जागांवर निवडून आणण्यासाठी भाजपची विशेष रणनीती
या ७५ जागा निवडून आणण्याची राज्यातील बड्या नेत्यांवर जबाबदारी
प्रत्येक बड्या नेत्यावर विधानसभेचे 7-8 मतदार संघाची जबाबदारी देण्याचं नियोजन
त्या नेत्यांनी आपल्या अहवाल नेतृत्त्वाकडे द्यायचा
भाजपकडून त्या त्या नेत्यांचे दौरे सुरू
Maharashtra politics : युती आघाडीच्या राजकारणात अजुन एका नव्या प्रयोगाची नांदी पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीसाठी संभाजी छत्रपतींनी पुढाकार घेतला आहे.
आघाडीच्या दृष्टीने आज मुंबईत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
वाय बी चव्हाण सेंटरमध्ये थोड्याच वेळात बैठक होणार आहे. स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर व इतर छोट्या पक्षांची मिळून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Maharashtra politics latest news : महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर आज तातडीची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार, नाना पटोले, संजय राऊत हे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या गंभीर घटना, राजकीय आणि सामाजिक घडामोडी यांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असून महाविकास आघाडीची पुढील रणनीती व दिशा ठरवली जाणार आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा याबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होणार आहे, त्यासोबतच बदलापूर मधील घटना, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार याबाबत महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते चर्चा करणार आहेत
मालवणात शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला हा पुतळा निकृष्ट बांधकामामुळे अवघ्या आठ महिन्यांत कोसळला, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे... त्यामुळे या बैठकीत या सगळ्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे... महाविकास आघाडीची भूमिका व पुढील रणनीती या सगळ्या बैठकीनंतर ठरणार आहे
Mumba News : बदलापूरची घटना ताजी असताना मालवण मधल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अशा प्रकारे कोसळलं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे, हे फक्त निषेध करू या विषयाला फाईल बंद करता येणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे, हे आता उघड झाले आहे. प्रख्यात शिल्पकार रामपुरे यांनी आज एक माहिती दिली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना पुणे महापालिकेकडून इशारा देण्यात आलाय. गणेशोत्सवासाठी मांडव टाकताना अनेक गणेश मंडळांकडून रस्त्यावर खड्डे केले जातात.
खड्डे घेतल्यास ते पूर्ववत करण्याची जबाबदारी संबंधित मंडळांचीच आहे. त्यांनी तसे न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी मांडव उभारण्यासाठी खड्डे खोदले आहेत.
याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून पालिकेला मिळाल्या असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
खड्डे घेतल्यास ते बुजवून पुन्हा पूर्वीप्रमाणे करण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळांचीच आहे. त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असा इशारा पालिकेने दिला आहे
गणेश मंडळांनी हे खड्डे न बुजविल्यास त्यांना पालिकेच्या माध्यमातून दिली जाणारी परवानगी देखील रद्द होऊ शकते, असा इशारा सुद्धा पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दिलाय.
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणी १२ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीसाठी तारीख निश्चित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी याचिका दाखल केली होती.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता
प्रकरणाची कॉम्पुटर जनरेटेड नवी तारीख
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंच्या वतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती
प्रकरण उच्च न्यायालयात चालणार की सुप्रीम कोर्टात तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्ट पुनर्विचार करणार का याबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय होणार
Maharashtra politics latest news : महायुतीत जागा वाटपाचा पेच कायम असतानाच अडसुळांनी दर्यापूरची जागा शिवसेनेला सुटल्यात जमा असल्याचं विधान माजी खासदार आनंद अडसूळ यांनी केले आहे.
अमरावती लोकसभेच्या जागेवर प्रबळपणे दावा ठोकूनही ती जागा भाजपच्या नवनीत रानांना सुटल्यापासूनच निराश असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंद अडसूळ यांनी एक मोठ विधान केलाय.. दर्यापूरच्या विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटल्यात जमा असल्याचं अडसुळांनी म्हटलेय... महायुतीत तीनही पक्षाच्या जागा वाटपाचा पेच कायम असतानाच अडसूळ यांनी हे विधान केलंय.. तर गेल्या दोन दिवसापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दर्यापूर विधानसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती.. त्यामुळे दर्यापूरच्या जागे संदर्भात तीनही पक्षांकडून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आला नसल्याने अडसुळांच्या या विधानाने मात्र तीनही पक्षाचे कार्यकर्ते चांगलेच संभ्रमात पडलेय.. त्यांचे पुत्र कॅप्टन अभिजीत अडसूळ हे तिन्ही पक्षांच्या मर्जीतले असल्याने त्यांना विधानसभेसाठी काही अडचण येणार नसल्याचेही आनंद अडसूळ यांनी स्पष्ट केलंय...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 800 ग्रामपंचायतीचा ऑनलाईन कारभार हा ठप्प झालाय. त्यामुळे मागील काही दिवसापासून ग्रामपंचायत मधून मिळणारे जन्ममृत्यूचे दाखले आणि इतर कागदपत्रे घेण्यासाठी नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. मागील 25 दिवसापासून हे कामकाज ठप्प झाले आहे. दरम्यान संगणक परिचालकांची सेवा कायम ठेवायची की नाही या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायतीची ऑनलाईन सेवा कोलमडलेली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांचे आता शासन निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
पुण्यातील हडपसरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या मुलीचा शिक्षकाकडूनच विनयभंग झालाय. हडपसर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ( पॉक्सो ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. २६ ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने दिली होती.
पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरणाला राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
पलुस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे.
samruddhi mahamarg : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्याची बातमी 11 जुलै रोजी साम टीव्ही ने दाखवली होती. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक जवळ ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्याचे चित्र साम टीव्ही न्यूज ने दाखवले होते. त्यानंतर या बातमीची दखल घेत तात्काळ संबंधित प्रशासनाने या भेगा बुजवण्याचं काम हाती घेतलं होतं. त्यावेळी यंत्रणांची देखील धावाधाव झाली होती. मात्र एक महिन्यात पुन्हा एकदा या भेगा जशास तशा पाहायला मिळत आहे.
ST Bus : एसटी प्रवास, सुरक्षित प्रवास मानला जातो. अलीकडे एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट 75 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत प्रवास अशा विविध योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवाशांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पूर्वी तोट्यात चालणारी एसटी बस विविध योजनांमुळे भरून चालत आहे. अनेकांना सीटसुद्धा मिळत नाही. एसटी महामंडळ प्रगतिपथावर आहे. एसटीने जाणाऱ्या प्रवासाची संख्या प्रचंड वाढली असून, उत्पादनातही वाढ झाली आहे. यामुळे गाव तिथे धावणारी एसटी सध्या प्रवाशांना दिलेल्या विविध सवलतींमुळे फायद्यात आहे.
भंडारा विभागात एकूण सहा आगार आहेत. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद जोपासत लालपरी धावते. विभागातील सहा आगारांतून जवळपास 381 बस धावत आहेत. पूर्वी प्रवाशांची ओरड होती. मात्र, महामंडळाने लालपरीच्या प्रवाशांसाठी विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे आपसूकच प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदा जानेवारी ते जुलै या सात महिन्यांचा विचार केल्यास भंडारा विभागातून तब्बल 45 लाख 36 हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यातून महामंडळाला तब्बल 218 कोटी 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे लालपरी सध्या फायद्यामध्ये धावत असल्याचे दिसून येत आहे.
Sangli Crime : सांगली शहरामध्ये एका कबड्डीपट्टू तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. अनिकेत हिप्परकर,असे या तरुणाचे नाव आहे. शहरातल्या जामवाडी या ठिकाणी धारदार शस्त्रांनी वार करत अनिकेत याची ही हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अनिकेत हा व्यायाम करण्यासाठी घरातून बाहेर पडला असता,त्याच्या मागावर असणाऱ्या चार ते पाच हल्लेखोरांनी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या मरगूबाई मंदिराजवळ अनिकेतला गाठून त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला,यामध्ये अनिकेत याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळतात सांगली शहर पोलिसांसह पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला,त्याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके देखील रवाना करण्यात आली.मात्र हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे स्पष्ट होऊ शकले नाही,मात्र हत्येच्या घटनेने सांगली शहर हादरून गेले आहे.
Pune News : मावळात सध्या पावसाने जोरदार मुसंडी मारली असून त्यामुळे डोंगर माथ्यावरील नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले असून मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर ही अनेक धबधबे वाहू लागलेत त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना एक वेगळा फिल येत असल्याचं दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून गावाकडे परत जात असताना सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर चालत्या दुचाकी वर भोवळ आल्याने खाली पडून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पार्वती जनार्दन बनसोडे असे या महिलेचे नाव असून त्या मूळ अंबड तालुक्यातील आहे.आपल्या मुलासोबत छत्रपती संभाजी नगर मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आल्या होत्या.मात्र पैसे काढून झाल्यानंतर गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या घटनेमुळे पाचोड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
RSS : आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. डॉ. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्या सारखी ASL (एडवांस सेक्युरिटी लायझनिंग) सुरक्षा मिळणार आहे. वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असेल.
Mahavikas Aghadi : मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला मालवणात प्रतिसाद मिळालेला दिसत आहे. व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा दिल्याचे चित्र दिसत आहे. आज महाविकास आघाडीच्या वतीने जनसंताप मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. या मोर्चात आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे सहभागी होणार आहेत
Pune News : शाळांमध्ये मुलींना त्यांच्या तक्रारी मांडता येण्यासाठी शाळास्तरावर ‘सखी समिती’ स्थापन करण्याचे आदेश पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध करून जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
Pune News : पुण्यातील ८० बाल कलाकारांनी अयोध्या स्थित प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रांगणात ग.दि माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बाल कलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम होता. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बाल कलाकारांनी गीतरामायणातील निवडक १६ सुमधुर गाणी सादर केली.
Pune News : पुण्यात किरकोळ वादातून दुचाकींची तोडफोड
Pune Crime News Update : पुण्यात किरकोळ वादातून दुचाकींची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील हडपसर भागात टोळक्याकडून दुचाकींची तोडफोड झालेल्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार शनिवारी रात्री हडपसर परिसरातील असलेल्या पुरंदर कॉलोनी मध्ये घडला. फिर्यादी आणि गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपी मध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शनिवारी रात्री २० ते २५ जणांनी त्या ठिकाणी येऊन दहशत माजवयाला सुरुवात केली आणि आम्ही इथेले भाई आहोत असे म्हणत फिर्यादी यांच्या दुचाकींची तोडफोड करत नुकसान केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.