

मॉरिशसच्या मोकामध्ये महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा
महाराष्ट्र आणि मॉरिशस या दोन्ही प्रदेशांमधील मैत्रीचे नाते पिढ्यानपिढ्यांचे
मराठी जनसमुदायाने सांस्कृतिक नाळ अतिशय अभिमानाने जपली - रविंद्र चव्हाण
'महाराष्ट्र आणि मॉरिशस दोन्ही प्रदेशांचं मैत्रीचे नाते पिढ्यांपिढ्याने आहे. आता सातासमुद्रापार राहूनही मराठी जनसमुदायाने सांस्कृतिक नाळ ही अभिमानाने जपल्याचे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. ते मॉरिशसमध्ये बोलत होते. मॉरिशसच्या मोकामध्ये महाराष्ट्र भवनाच्या विस्तारित वास्तूचा पायाभरणी सोहळा पार पडला. या सोहळ्याला रविंद्र चव्हाण यांनीही हजेरी लावली. महाराष्ट्र भवन वास्तूच्या विस्तारासाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रविंद्र चव्हाण हे दोन दिवस मॉरिशसच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी मॉरिशसमध्ये अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. यावेळी त्यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत-मॉरिशस मैत्रीवर चर्चा केली. तसेच ब्ल्यू इकॉनॉमी, पर्यटन, AI आणि सायबर सुरक्षा यांसारख्या विषयांवर चर्चा केली. मॉरिशस हा भारताचा लहान भाऊ आहे, असे सांगून त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक केलं.
मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री, आयटी आणि इनोव्हेशन मंत्री, सांस्कृतिक नेत्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी भारतातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी सांस्कृतिक देवाण-घेवाण, वाचनालय, जागरी नृत्याचे युनेस्को नामांकन या विषयांवर चर्चा झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
महाराष्ट्र भवनासाठी किती निधी मंजूर केला?
फडणवीस सरकारने मंजूर केलेल्या ८ कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या वास्तूमुळे जागतिक स्तरावर मराठी अस्मिता बळकट होणार आहे. या वास्तूमधील सभागृहाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांचे नाव देण्यात येणार आहे. या दौऱ्यादरम्यान मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनतर्फे आयोजित 'महा गणेशोत्सव २०२५' या कार्यक्रमात अनुदान वितरण करण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र-मॉरिशस स्नेहबंधाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचा ठाम विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
मॉरिशसमधील खासदार अर्विन बाबाजी, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष बलराज नारू, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे मुख्य धर्मगुरु गुरुजी संताराम राजू अशा अनेक मराठी मंडळींशी रविंद्र चव्हाण यांनी चर्चा केली. तसेच मेलरोझ गजानन सरस्वती मंदिर, माँट रोचेस मराठी मित्र मंडळी, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, डागोटियर मराठी शिव मंदिर अशा संस्थांना महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने चव्हाण यांनी अनुदान दिलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.