भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

Ashok kharat news : भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना झाले आहेत. त्याने राजकीय नेत्यांना लाखोंचा चुना लावल्याचे समोर आलं आहे.
ashok kharat news
Ashok kharat newsSaam tv
Published On
Summary

९ लाख रुपयांना ‘तुर्की मध’ विकून करायचा फसवणूक

राजकीय नेते आणि उद्योजकांनाही लावला लाखोंचा चुना

‘खरात फाईल्स’मध्ये १५० पेक्षा अधिक व्हिडिओ

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड झाले आहेत. या भोंदूने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. तर राजकीय नेते आणि उद्योजकांना लाखोचा चुना लावल्याचे देखील समोर आलं आहे. तुर्की मधाच्या नावाखाली खरातने फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दराने मधाची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

भोंदू खरातने तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून १ किलो मधाची बाटली ९ लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली आहे. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना ही मधाची विक्री केली जायची. एल्विश हनीची विक्री करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळत असल्याचा दावा करत विक्री करायचा. महागड्या दराने मध विक्री करून आलेली रक्कम त्याच्या ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती हाती आली आहे.

ashok kharat news
कॅप्टन खरातमुळे राजकीय नेता अडचणीत? कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच

खरात फाईल्समध्ये १५० पेक्षा अधिक व्हिडिओ

नाशिकमध्ये खरात प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. 'खरात फाईल्स’मध्ये १५० पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याची माहिती हाती आली आहे. यापूर्वी १०० पेक्षा अधिक व्हिडिओ असल्याचे समोर आले होते. आता आकडा वाढल्याने प्रकरण आणखी गंभीर झालं आहे. आक्षेपार्ह आणि संवेदनशील व्हिडिओंचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. यामुळे अनेक पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. SIT आणि पोलिसांकडून व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू आहे. या व्हिडिओंमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

ashok kharat news
१०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन खरातच्या आणखी 'करामती'; एकापेक्षा एक कारनामे उघड

भोंदूबाबा खरात प्रकरणात आयकर विभागाची एन्ट्री

भोंदूबाबा अशोक खरात आणि सनदी अधिकाऱ्यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदूबाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. यात - भोंदूबाबा अशोक खरात सोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक गेल्याची माहिती आहे. यात आणखी कोण अधिकारी आहेत, याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com