Mahadevrao Mahadik On Satej Patil : मी शेलारमामा, आलते शड्डू मारायला शिकवायला...फूकून उडवून टाकेन; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक गटाने विजयी घाैडदाैड सुरु ठेवली आहे.
mahadevrao mahadik, Rajaram Sahakari Sugar Factory Election Results,
mahadevrao mahadik, Rajaram Sahakari Sugar Factory Election Results, saam tv

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result News : कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांनी विजयाचे श्रेय सभासदांबराेबरच माजी आमदार अमल महाडिक आणि खासदार धनंजय महाडिक यांना दिले. या विजयामुळे कोल्हापूरच्या (kolhapur) राजकारणाला वेगळी दिशा मिळाल्याचे महादेवराव महाडिक यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

mahadevrao mahadik, Rajaram Sahakari Sugar Factory Election Results,
Shivendraraje News : शेतक-यांच्या व्यथा.. देवस्थानच्या जमिनींमुळे पीक कर्ज मिळेना : मार्ग काढण्याचे शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्याना आवाहन

राजाराम साखर कारखाना निवडणूकीत महादेवराव महाडिक यांचा 39 मतांनी विजय झाला. याचबराेबर त्यांच्या गटातील उमेदवारांनी विजयाकडे घाैडदाैड सुरु ठेवली आहे. माध्यमांशी बाेलताना महादेवराव महाडिक यांनी आजचा विजय हा आवाडे सावकार, विनय काेरे यांच्यासह सर्व महाडिक गटाचा आहे. या सर्वांचे महादेवराव महाडिक यांनी आभार मानले.

mahadevrao mahadik, Rajaram Sahakari Sugar Factory Election Results,
Raju Shetti News : हे प्रकरण तुम्हांला महागात पडल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना इशारा

महादेवराव महाडिक म्हणाले महाडिकांकडे असलेली ताकद ही गोरगरीब जनतेची आहे. धनंजय महाडिक अमल महाडिक यांना पहिले सलामी द्या, मग बाकीचं पुढंच पुढं पाहू. ज्याला शड्डू मारायला येत नाही, त्याला शड्डू मारायला शिकवत आहेत. मी शेलार मामा आहे, मी फूकून उडवून टाकेन, असा इशाराही महादेव महाडिक यांनी विरोधक सतेज पाटील गटास दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com