Shivendraraje News : शेतक-यांच्या व्यथा.. देवस्थानच्या जमिनींमुळे पीक कर्ज मिळेना : मार्ग काढण्याचे शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्याना आवाहन

या भेटीत जिल्ह्यातील शेतक-यांच्या अडचणी शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्र्यांसमाेर मांडल्या.
cm eknath shinde
cm eknath shindesaam tv
Published On

Shivendraraje Bhosale News : सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendraraje bhosale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांची त्यांच्या दरे या गावी जाऊन भेट घेतली. यावेळी दाेघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी जावलीतील एका कार्यक्रमाचे येण्याबाबत निमंत्रण दिले. (Breaking Marathi News)

cm eknath shinde
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; महादेवराव महाडिक, सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला

जन्नीदेवी पूजा महाेत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे तर्फ तांबे (ता. महाबळेश्वर) या त्यांच्या गावी आले आहेत. मुख्यमंत्री यांचा दाेन दिवसांचा हा दाैरा आहे. या दाै-यात त्यांचे अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते भेट घेताहेत.

cm eknath shinde
Barsu Refinery Project News : 'इंग्रज, माेगल तरी बरे हाेते पण शिंदे-फडणवीस सरकारची ती देखील लायकी नाही' (पाहा व्हिडीओ)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ही भेट केवळ मुख्यमंत्र्यांना आंबेघर येथील कार्यक्रमासाठीचे निमंत्रण देण्यासाठीची हाेती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे आमदार भाेसले यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले सध्या कास पठारावरील बांधकाम काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिली असल्याने त्यांनी याबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी जे अधिकारात आहे ते नियमित करण्यात अडचण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

पीक कर्जात देवस्थानच्या जमिनीचा अडथळा

दरम्यान सातारा जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी देवस्थानच्या जमिनी आहेत. त्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज देण्यात बॅंकांना अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे काेणाला कर्ज मिळू शकत नाही. पुर्वी इ-करार करुन पीक कर्ज दिले जात हाेते. परंतु सध्या त्यात अडचणी येताहेत. सरकारने त्यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी सातारा जिल्हा बॅंक संचालक ज्ञानदेव रांजणे, हभप प्रवीण महाराज शेलार, माजी नगरसेवक अविनाश कदम उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com