- रणजीत माजगावकर
Barsu Refinery Project Latest Update : अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लढू पण मागे हटणार नाही. इंग्रज सरकार हाेतं ते बरं हाेतं अशी म्हणण्याची वेळ शिंदे-फडणवीस सरकारने आणली आहे अशी तीव्र भावना बारसू प्रकल्पाला विराेध करणा-या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (Breaking Marathi News)
रत्नागिरी (ratnagiri news) जिल्ह्यातील बारसू प्रकल्पाच्या (barsu refinery project) विराेधात ग्रावकरी एकटवले आहेच. आज (साेमवार) हाेणा-या सर्वेक्षणाचे कामास ग्रामस्थांनी विराेध दर्शविला आहे. प्रशासनाच्या विरोधात दहा किलोमीटरचा महिलांनी लाॅंग मार्च काढला. उन्हातानात लाॅंग मार्चमध्ये शेकडाे महिला सहभागी झाल्या आहेत. गावक-यांचा विराेध लक्षात घेता या आंदाेलनस्थळी पाेलिसांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांनी साम टीव्हीने संवाद साधताना गेली दाेन वर्ष आम्ही प्रकल्पास विराेध दर्शवित आहाेत. तरी सरकार प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. खासदार विनायक राऊत यांनी स्थानिकांशी चर्चा करु असे सांगितले हाेते. परंतु आजपर्यंत त्यांनी आमची भेट घेतलेली नाही असे एका ग्रामस्थाने नमूद केले.
ही जमीन आम्हांला कसण्यासाठी हवी. हा प्रकल्प आम्हांला नकाेय. यातून नाेकरी मिळाल्या तरी त्या नकाे आहेत. आमची मुलं कमवून खातील असेही महिलांनी स्पष्ट केले.
एका ग्रामस्थाने शिंदे-फडणवीस सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढविला. आम्ही शेतकरी आहाेत आतंकवादी नाही. रात्री अपरात्री नाेटीसा देण्यासाठी पाेलिस येताहेत. मी एक सामान्य शेतकरी आहे. आमचा अखेरच्या श्वासापर्यंत प्रकल्पास विराेध आहे. इंग्रज सरकार, माेगल हाेते ते तरी बरे हाेते परंतु शिंदे फडणवीस सरकारची ती पण लायकी नाही अशा तिखट शब्दांत ग्रामस्थांनी सरकारला फटकारलं.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.