- जितेश कोळी
Parshuram Ghat Bandh : मुंबई गाेवा महामार्गावरील (Mumbai Goa Highway News) परशुराम घाटातील (parshuram ghat latest news) वाहतुक येत्या २५ एप्रिलपासून १० मे पर्यत ठराविक वेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. या कालावधीत घाटातील सर्व सर्वप्रकारची वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पूर्णत: बंद राहणार आहे.
पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील काम जलदगतीने पूर्ण व्हावीत यासाठी ठेकेदार कंपनीने प्रशासनाला घाटातील वाहतूक काही दिवस दिवसा बंद ठेवण्याची परवानगी लेखी पत्राद्वारे मागितली हाेती. त्यास प्रशासनाने संमती दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकताच मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल पासून 10 मे पर्यंत दुपारच्या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घाटातील सर्वप्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
या कालावधीत महामार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या वेळेत हलकी वाहतूक पर्यायी मार्गाने लोटे - चिरणी- आंबडस - कळबस्ते- चिपळूण या मार्गाने सुरु राहिल. प्रवाशांनी परशूराम घाटातील वाहतुकीच्या बदलाची नाेेंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.