Yuvraj Sambhajiraje Chhatrapati News : मतभेद बाजूला ठेवा अन् जबाबदारी घ्या : संभाजीराजे छत्रपतींचे सरकारला आवाहन

सरकारने जबाबदारी घेऊन एक समिती
yuvraj sambhajiraje chhatrapati
yuvraj sambhajiraje chhatrapatisaam tv

- सचिन कदम

Raigad News : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांच्यावर सर्वमान्य पुस्तक बाजारात उपलब्ध नाही. बाहेर गेलो की राजस्थानच्या इतिहासावर महागडी पुस्तक विक्रीस दिसतात पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर दर्जेदार पुस्तक मिळत नाहीत अशी खंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. शासनाने पुढाकार घेऊन वादातीत मुद्दे बाजुला ठेवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक दर्जेदार सर्वमान्य पुस्तक प्रकाशित करावे अशी अपेक्षा संभाजीराजेंनी सरकारकडे व्यक्त केली आहे. (Breaking Marathi News)

yuvraj sambhajiraje chhatrapati
Barsu Refinery Project : काेकणी माणूस मागे हटणार नाही : बारसूतील आंदाेलनावर ग्रामस्थ ठाम; गैरसमज दूर करू : पालकमंत्री उदय सामंत

रायगड (raigad news) जिल्ह्यातील 59 किल्ल्यांची ओळख सांगणार्‍या ‘इये देशीचे दुर्ग’ या ज्येष्ठ गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे लिखित पुस्तकाचे प्रकाशन रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात युवराज संभाजीराजे छत्रपती (yuvraj sambhajiraje chhatrapati) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल तटकरे होते.

yuvraj sambhajiraje chhatrapati
IDBI BANK ची ६३ लाखांची फसवणूक, मास्टरमाइंड युवतीसह सात अटकेत

संभाजीराजे छत्रपती म्हणाले आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो, त्यांची शिकवण सांगतो, आपले चारशे वर्षांचे इतिहास पाहावे. परंतु शिवरायांविषयी एकही असे ठाेस पुस्तक उपलब्ध नसल्याची खंत राजेंनी व्यक्त केली. सरकारने जबाबदारी घेऊन एक समिती नेमावी त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयीचे एक सर्वमान्य पुस्तक नागरिकांसमाेर आणावे अशी अपेक्षा संभाजीराजेंनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com