Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News
Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur Newssaam tv

Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: राजाराम कारखान्याची मतमोजणी सुरू; महादेवराव महाडिक, सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला

Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result: सुरवातीला सर्व उत्पादक आणि इतर गटांची मतमोजणी केली जाणार. सर्वात शेवटी संस्था गटाच्या एका जागेची मतमोजणी होणार आहे.
Published on

Kolhapur News : कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा (Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election) निकाल आज (मंगळवार) लागणार आहे. या निवडणुकी निमित्त गेले महिनाभर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले हाेते. या निवडणुकीच्या मतमाेजणीसाठीची जय्यत तयारी पुर्ण झालेली आहे. (Breaking Marathi News)

Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News
Barsu Refinery Project News : बारसू रिफायनरीच्या आंदाेलक महिलांना उष्माघाताचा त्रास, रुग्णालयात हलवलं

माजी मंत्री सतेज पाटील (satej patil) विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) यांच्या गटात मुख्य लढत आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी अंत्यत चुरशीने 12 हजार 336 (91.12 टक्के) इतके मतदान झालं आहे.

Satej Patil, Mahadevrao Mahadik, Kolhapur News
Satara APMC Election News : आम्ही लढणारी माणसं, 'स्वाभिमानी' चा कार्यकर्ता धमक्यांना भीक घालत नाही : राजू शेट्टी

आज (साेमवार) सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीची तयारी (Chhatrapati Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election Result News) सुरू झाली आहे. सुमारे 29 टेबल मतमोजणीसाठी मांडण्यात आले आहेत. पहिल्या फेरीत 29 केंद्राची आणि त्यानंतर 29 ते 58 केंद्राची मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना काेणाच्या ताब्यात राहणार याचे चित्र स्पष्ट होईल.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com