Latur News: जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला तडे; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सरकार उदासीन

लातूरपासून केवळ 15 किमी अंतरावर असणाऱ्या चिकलठाणा येथील जिल्हा परिषद शाळाची इमारत जीर्ण झाली आहे.
File Photos
File PhotosSaam tv
Published On

संदिप भोसले

Latur News: राज्य सरकार शैक्षणिक धोरणासाठी दर वर्षी मोठ बजेट सादर करतं. पण, सध्या राज्यभरात जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यावर शासन भर देत आहे. मात्र लातूरपासून केवळ 15 किमी अंतरावर असणाऱ्या चिकलठाणा येथील जिल्हा परिषद शाळाची इमारत जीर्ण झाली आहे. या शाळेत 105 विद्यार्थी आपलं शिक्षण जीव मुठीत घेऊन शिकत आहेत. (Latest Marathi News)

या विषयाला गांभीर्याने घेऊन, स्थानिक प्रशासनाने आणि शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देण गरजेचं आहे. अस ग्रामस्थांचं व पालकांच म्हणण आहे. या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत चालली आहे.

File Photos
Devendra Fadnavis On CM Shinde : जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

इमारतीचं बांधकाम कालबाह्य झाल्यानं ही दुरवस्था झाली आहे. त्यामुळं सहाजिकच विद्यार्थ्यांनी व पालकांनी या शाळेकड पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास पुरेशी बाके नाहीत. उखडलेले प्लास्टर, तुटलेली दारे, गळके वर्ग, फुटक्या फरशा यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.

File Photos
Devendra Fadnavis News : 'शरद पवारांनी डबल गेम केला', पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा मागणी केल्यावरही शाळेची दुरुस्ती करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना धोकादायक स्थितीतच शिक्षण घ्यावं लागत आहे. गावचे उपसरपंच हे शाळेसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधकाम करणार असल्याचे बोलत आहेत. मात्र, सध्या पावसाळा असल्याने बांधकाम कसे होईल, हा प्रश्न गावकऱ्यांना पडतोय. ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन या सर्वांच्या कागदी घोड्यात खेळ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com