Devendra Fadnavis News : 'शरद पवारांनी डबल गेम केला', पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत स्थिर सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे आधी आम्हाला सांगण्यात आले होते, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
Devendr Fadnavis- Sharad Pawar
Devendr Fadnavis- Sharad PawarSaam TV
Published On

Mumbai News : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर पडलेलं सरकार, याबद्दल आजही अनेक तर्क लावले जातात. याबद्दल कुणीही स्पष्ट बोलायला तयार नसतं. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या शपथविधीवरुन आता शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी डबल केल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, 2019 मध्ये भाजप-राष्ट्रवादीने सरकार स्थापन करण्याचं ठरलं होतं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत सरकार स्थापनेसाठी चर्चा सुरू केली होती. त्यावेळी राष्ट्रवादीतील काही लोक भाजपच्या संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत स्थिर सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे आधी आम्हाला सांगण्यात आले होते, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. (Latest News Update)

Devendr Fadnavis- Sharad Pawar
WC 2023, Ind vs Pak Match : भारत-पाकिस्तान सामना भारतात व्हावा हे अजिबात पटणारं नाही; मनसेचा विरोध BCCIचं टेन्शन वाढवणार

शरद पवार अचानक मागे हटले

सरकार स्थापनेबाबत शरद पवार यांच्यासोबतही बैठक पार पडली होती. सरकार स्थापनेचे सर्व अधिकार मला आणि अजित पवार यांना दिले होते. त्यानुसार आम्ही तयारी केली. मात्र 3-4 दिवसातच शरद पवार मागे हटले आणि अजित पवारांकडेही पर्याय उरला नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं. (Political News)

अजित पवारांकडे पर्याय नव्हता

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांना माझ्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण त्यांनी सर्व तयारी केली होती. ते माझ्यासोबत राहिले नसते तर त्यांनी अडचण झाली असती. म्हणूनच आम्ही शपथ घेतली. मात्र त्यानंतर जे झाले ते सर्व जनतेने पाहिले.

Devendr Fadnavis- Sharad Pawar
Ashadhi Ekadashi 2023: सलग २५ वर्षांपासून पायी वारी, आता मिळाला विठ्ठलाच्या महापूजेचा मान; जाणून घ्या कोण आहे काळे दाम्पत्य

शरद पवारांना डबल गेम केला

शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली होती. युती तोडून उद्धव ठाकरे यांनी आधीच पाठीत खंजीर खुपसला होता. शरद पवारांना आमच्याशी चर्चा करुन आमची दिशाभूल केला. ही त्यांची रणनिती आखली आणि त्यानंतर शरद पवारांनी डबल गेम केला, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com