Devendra Fadnavis On CM Shinde : जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी चूक मान्य केली, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा

Devendra Fadnavis News : पक्षात काही कमी बुद्धीचे लोक असतात, त्याच्या चुकीच्या कामामुळे अशा चर्चा होतात.
Eknath SHinde
Eknath SHindeSaam TV
Published On

Mumbai News : 'राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे', या जाहिरातीवरुन भाजप-शिवसेनेमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन चूक मान्य केल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझ्यात सुसंवाद आहे. आम्ही दोघेही एकमेकांच्या पदाचा आणि कामाचा सन्मान करतो. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता. जाहिरात चुकीची छापली गेली. आमच्या लोकांनी चूक केली केली, असंही त्यांनी मान्य केलं, असं फडणवीसांनी सांगितलं. (Latest Marathi News)

Eknath SHinde
Devendra Fadnavis News : 'शरद पवारांनी डबल गेम केला', पहाटेच्या शपथविधीवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्पष्ट बोलले

आम्ही दोघांनी एक मर्यादा ठेवली आहे. मात्र पक्षात काही कमी बुद्धीचे लोक असतात, त्याच्या चुकीच्या कामामुळे अशा चर्चा होतात. अशा गोष्टींमुळे आमच्या मतभेद होतील आणि सरकार पडेल हे शक्न नाही. आम्ही एका मोठ्या विचाराने आणि ध्येयाने हे सरकार स्थापन केलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Eknath SHinde
Kalyan News: कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर शिंदे गट व ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन; किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

काय होतं जाहिरातीत?

राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे, अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. (Maharashtra Political News)

मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणानुसार, एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविली. महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार... असं शिंदे यांच्या जाहिरातीत म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com