Kalyan News
Kalyan NewsSaamtv

Kalyan News: कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर शिंदे गट व ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन; किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

Durgadi Fort Shivsena Protest: आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नेतृत्वाखाली 1986 पासून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानात आंदोलन सुरू करण्यात आले.
Published on

अभिजित देशमुख, कल्याण...

Mumbai Kalyan News: आज राज्यभरात आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) उत्साह आणि जल्लोश पाहायला मिळत आहे. एकीकडे विठूनामाच्या गजरात सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत असताना मुस्लिम बांधवांमध्येही बकरी ईदच्या (Bakari Eid) सणाचा उत्साह दिसत आहे. दोन्ही सण मोठ्या आनंदात साजरे केले जात असतानाच कल्याणमध्ये वादाची ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे.

याचे कारण म्हणजे दरवर्षीप्रमाणे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट या दोन गटांकडून कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन केले जात आहे. यानिमित्ताने बॅरिकेट्स ओलांडून काही कार्यकर्त्यांनी किल्ल्यात प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला.

Kalyan News
Rath Yatra Accident: जगन्नाथ रथयात्रेत मोठी दुर्घटना! ७ जणांचा मृत्यू; १५ जखमी

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्गाडी किल्ल्यावर (Durgadi Killa) हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. बकरी ईदच्या दिवशी हिंदु भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध केला जातो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने आंदोलन केले जाते.

३७ वर्षाचा इतिहास...

आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नेतृत्वाखाली 1986 पासून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानात आंदोलन सुरू करण्यात आले. तेव्हापासून गेली 37 वर्ष हे आंदोलन सुरू आहे. यावेळी शिवसेनेत (Shivsena) फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते किल्ल्याच्या परिसरात जमा झाले होते.

Kalyan News
Nagpur Crime News: नागपुरात ३२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार; सीताबर्डी परिसरातील धक्कादायक घटना

दरम्यान, यावेळी शिवसेना शिंदे गटा पाठोपाठ ठाकरे गटाचे देखील घंटा नाद आंदोलन सुरू केले. शिंदे गटाच्या या मोर्चामध्ये आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे,शहरप्रमुख रवी पाटील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर दुर्गाडी किल्ल्यावर जवळील लाल चौकी परिसरात ठाकरे गटाचे आंदोलन झाले.

या आंदोलनात ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, जिल्हाप्रमुख विजय साळवी सहभागी झाले होते. यावेळी शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला.यावेळी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com