लातूरमध्ये पाणी चोरी! मुख्य जलवाहिनीवर चोरट्यांचा डल्ला, 25 जणांवर कारवाई, 300 जणांना नोटीस

Water Theft In Latur: लातूरमध्ये मुख्य जलवाहिनीवरून अवैध पाणी चोरीचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेकडून आतापर्यंत 300 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 25 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
Water Theft In Latur:
Latur Water Theft Exposed | 300 Notices Issued, 25 People Penalised
Published On: 

संदीप भोसले, साम प्रतिनिधी

आगामी काळात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून, मुख्य जलवाहिनीवरून पाणी चोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे. कासार जवळा येथील मुख्य जलवाहिनीवरून पाणी चोरी केल्याप्रकरणी संबंधित नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनपा प्रशासनाच्या या कारवाईमुळे पाणी चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Water Theft In Latur:
आंब्याच्या झाडांना लागली सलाईन! आमराईतील प्रत्येक झाडाला छत्री अन् एक IV; उष्णतेपासून बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो मात्र सध्या मांजरा धरणात केवळ सहा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने शहरातला पाणीपुरवठ्या करण्यात येणारा कालावधी देखील वाढवला आहे.दरम्यान मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरून अवैधरित्या पाणी चोरी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

तर लातूर महानगरपालिकेच्या 18 पथकात कडून, ही कर्डी नजर ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत अवैधरीत्या पाणी चोरी करणाऱ्या 300 जणांना नोटीस बजविण्यात आल्या तर 25 जणांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Water Theft In Latur:
ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! आता साखरेचे दर वाढले की शेतकऱ्यांनाही मिळेल फायदा; साताऱ्यातील बैठकीत काय ठरलं?

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर भविष्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे पाणी उपसले जात असल्यास त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ शकतो. त्यामुळे पाणी चोरी हा केवळ नियमभंग नसून हजारो नागरिकांच्या पाणीहक्कावर गदा आणणारा प्रकार ठरू शकतो.

याच पार्श्वभूमीवर लातूर महानगरपालिकेने पाणी चोरीविरोधात मोहीम हाती घेतली आहे. कासार-जवळा येथील प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत अनधिकृत हस्तक्षेप करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाणीटंचाईचे सावट, नागरिकांनीही जबाबदारी ओळखावी; प्रशासनाचे आवाहन

लातूर शहरात भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, अनावश्यक पाणी वापरावर नियंत्रण ठेवावे. पाणी बचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

परंतु एकीकडे पाण्याचे नियोजन केलं जात असताना दुसरीकडे पाणी चोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. ही परिस्थिती शहरासाठी चिंताजनक आहे. त्यामुळे पाणी चोरीविरोधातील कारवाई केवळ एका प्रकरणापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जलवाहिनी व्यवस्थेवर लक्ष ठेवून सातत्याने सुरू राहणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.