

लातूर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. आज येथील निलंगा तालुक्यातील हासोरी-बु गावात 1.6 रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री 8.57 वाजता हे भूकंपाचे धक्के बसेल आहेत.
गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. याआधी सोमवारी येथील हासोरी भागात 2.8 रिश्टर स्केलचे भूकंपनाचे धक्के जाणवले. सकाळी 6.29 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्येही येथे दोन महिन्यात भूकंपाचे नऊ धक्के जाणवले होते. यानंतर आता यावर्षी भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. बुधवारी भूकंपापाचे धक्के जाणवल्यानंतर येथील तलाठी बबन राठोड, नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी संबंधित गावाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. (Latest Marathi News)
दरम्यान, मंगळवारी दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे केंद्र नेपाळजवळ असल्याचे सांगण्यात आलं होतं. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.6 इतकी नोंदवली गेली आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा नेपाळमधील दिपायल येथील होता. हा केंद्रबिंदू हा जमिनीखाली 38 किलोमीटर खोल होता. या ठिकाणी भूकंपाची तीव्रता 6.2 रिक्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेशसह दिल्लीसह अनेक राज्यात जाणवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.