

नवीन Google Pixel 8 सीरीज लॉन्च झाली आहे. या सीरीजमध्ये कंपनीने Pixel 8 आणि Pixel 8 Pro असे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सबद्दलची बरीच माहिती आधीच समोर आली. यावेळी कंपनीने लॉन्च इव्हेंटमध्ये AI वर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याचा प्रभाव स्मार्टफोनवरही दिसून येत आहे.
हा स्मार्टफोन Tensor G3 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. हार्डवेअरसह सॉफ्टवेअरचे कॉम्बिनेशन केल्याचा कंपनीचा दावा आहे. Google Pixel 8 सीरीजमध्ये नवीन काय आहे हे जाणून घेऊ.
8 सीरीज काय आहे नवीन?
Tensor G3 चिपसेट Google Pixel 8 आणि 8 Pro या दोन्ही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. कंपनीने Pixel 8 मध्ये Actua डिस्प्ले दिला आहे, जो 2000 Nits च्या ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तर प्रो व्हेरिएंटमध्ये 6.8-इंचाचा सुपर अॅक्टुआ डिस्प्ले आहे, जो 2400 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. (Latest Marathi News)
प्रो व्हेरिएंटच्या मागील बाजूस टेम्परेचर सेंसर देण्यात आला आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कोणत्याही वस्तूचे तापमान जाणून घेऊ शकता. तुम्हाला Pixel 8 सीरीजमध्ये Pixel 7 सीरीजच्या तुलनेत चांगली परफॉर्मन्स पाहायला मिळेल. याचे कारण नवीन प्रोसेसर आहे. नवीन Pixel 8 सीरीजमध्ये 7 वर्षांची Android अपडेट मिळेल.
Pixel 8 Pro मध्ये 50MP + 48MP + 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनी प्रो व्हेरिएंटमध्ये अतिरिक्त फीचर्स दिले आहेत. ज्याचा तुम्ही व्हिडिओ एडिटिंगमध्ये फायदा घेऊ शकाल. Pixel फोनवर तुम्हाला Google Assistant सोबत Bard चा सपोर्ट मिळेल. म्हणजे तुम्ही गुगल असिस्टंटचा वापर अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल.
किती आहे किंमत?
हे फोन तुम्ही आजपासूनच प्री-ऑर्डर करू शकता. Pixel 8 ची किंमत 699 डॉलर्स आहे. यासोबत तुम्हाला Pixel Buds Pro मिळेल. तर Pixel 8 Pro ची किंमत 999 डॉलर्सआहे. यासोबत तुम्हाला पिक्सेल वॉच 2 मिळेल. तुम्ही भारतात Google Pixel 8 75,999 रुपयांना खरेदी करू शकता. तसेच Pixel 8 Pro तुम्ही 1,06,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. दोन्ही फोनची ही किंमत डिस्काउंटनंतर आहे. दोन्ही फोन Android 14 सह येतील. यासोबत OS अपडेट्स, सिक्युरिटी अपडेट्स आणि फीचर्स अपडेट्स 7 वर्षांसाठी उपलब्ध असतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.