

लातूर-नांदेड महामार्गावर तिहेरी अपघात
अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
दोन जण गंभीर जखमी
संदिप भोसले, साम टीव्ही
राज्यात अपघाताच्या घटना सुरूच आहे. राज्यातील लातूर जिल्ह्यातही भीषण अपघाताची घटना घडली आहे. लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे.
लातूर-नांदेड महामार्गावरच्या आलगरवाडी पाटीजवळ हा तिहेरी अपघात झालाय. पाटीजवळ तीन वाहने एकमेकांना धडकल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात कंटेनर, कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा तर कारमधील एका लहान मुलांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघाताच वाहनांचा चक्काचूर झाल्याचे दिसून आले.
महामार्गावर अपघात झाल्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनाही माहिती कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातातील मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. काही वेळानंतर पोलिसांनी रस्त्यावरील कोंडी हटवून वाहतूक सुरळीत केली. या तिहेरी अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातात पती-पत्नीचा मृत्यू
या दुर्घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी तसेच कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तेलगाव येथील जनार्दन येणगे आणि साविता येणगे यांचा समावेश आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.