एकाच गावातील ८ मित्रांचा मृत्यू; भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली, थरकाप उडवणारा अपघात कसा झाला?

ambenali ghat accident : साताऱ्याच्या आंबेनळीत भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची माहिती हाती आली आहे.
Satara accident
Satara Ambenali Ghat Saam tv
Published On
Summary

साताऱ्याच्या आंबनेळीत भीषण अपघात

कारमधील आठ जणांचा जागीच मृत्यू

अपघाताची धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली

सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली. महाबळेश्वर आणि पोलादपूरच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातामधील ५ तरुण हे कोरेगावच्या आसगावातील आहेत. तर दोन तरुण हे मर्ढे गावातील आहे. एक तरुण हा खटाव गावातील आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाने मिळून ८ जणांचे मृतदेह खोल दरीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले. ही अपघाताची घटना रात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.

Satara accident
भीषण अपघाताचा थरार! भरधाव कार कंटेनरला धडकली, ५ जणांचा जागीच मृत्यू

अपघात कसा घडला?

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यांनुसार, कार दरी कोसळल्याची दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती दिली. चालकाचं घाटात वळण आल्यानंतर कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर कार थेट खोल दरीत कोसळली. कार खोल दरीत कोसळताना तरुणांनी मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु कोणीही मदतीला धावू शकले नाही. अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे देखील समोर आली आहेत.

मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अंश समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), प्रवीण अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि संदीप काटकर (वय ३५) या तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

Satara accident
Accident News : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, कार आणि ट्रकची समोरासमोर धडक; एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू

तत्पूर्वी, अपघाताची माहिती मिळताच महाबळेश्वर टेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू केले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली. अपघातामागील दुर्घटनेचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु स्थानिकांनी आणि मृतांच्या कुटुंबीयांनी घटनेमध्ये शासनाला जबाबदार धरलं आहे. रस्त्यला संरक्षण कठडे नसल्यामुळे अपघात झाल्याची भावना व्यक्त केली. मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुबीयांना आर्थिक आधार शासनाने द्यावा, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com