बाप की हैवान! अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून लैंगिक अत्याचार

Jalkot Police Arrest Father In POCSO Case Involving Minor Girl: लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात मतीमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून, पोलिसांनी आरोपीवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Latur Police arrest a man for the heinous crime of assaulting his own minor daughter in Jalkot.
Latur Police arrest a man for the heinous crime of assaulting his own minor daughter in Jalkot.saam tv
Published On

संदीप भोसले, साम टीव्ही

रक्षकच भक्षक बनल्याची एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात समोर आली आहे. एका मतीमंद अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या तिच्या सख्ख्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी १९ आठवड्यांची गरोदर राहिली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Latur Police arrest a man for the heinous crime of assaulting his own minor daughter in Jalkot.
खरात, अयाननंतर आणखी एक व्हिडिओकांड! ५०० महिला, प्रायव्हेट व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग, तरुणाच्या कृत्यानं सगळेच हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जन्मतःच मतीमंद असून तिला स्वतःची व्यथा मांडता येत नव्हती. याच हतबलतेचा फायदा घेत तिचा नराधम बाप डिसेंबर २०२५ पासून तिच्यावर सतत पाशवी अत्याचार करत होता. मुलीच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे ती गरोदर असल्याचे समोर आले. याप्रकरणी पीडितेच्या आईने १७ एप्रिल २०२६ रोजी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरुद्ध दाखल करण्यात आला होता.

Latur Police arrest a man for the heinous crime of assaulting his own minor daughter in Jalkot.
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवले; मुलाला फाशी द्या! संतापलेल्या बापाची मागणी|VIDEO

मुलगी मतीमंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपास आणि कौशल्याच्या जोरावर या गुन्ह्यातील खरा नराधम तिचा बापच असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ३ मे रोजी त्याला अटक करून बेड्या ठोकल्या आहेत.

Latur Police arrest a man for the heinous crime of assaulting his own minor daughter in Jalkot.
Crime News: एकीकडे नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू; दुसरीकडे सासू अन् जावई शेतात सापडले नको त्या अवस्थेत

या नराधमाविरुद्ध जळकोट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहपोलीस निरीक्षक एस. बी. माचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता समाजातून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com