नसरापूर घटनेचा SIT करणार तपास; नराधमाला फाशी द्या, नागरिकांची मागणी

Pune Crime: पुण्यातील भोर तालुक्यात विकृतीचा कळस पाहायला मिळालाय. एका 65 वर्षांच्या नराधमानं अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेचे गंभीर पडसाद उमटताच सरकारनं आता या प्रकरणाचा तपास SIT कडे सोपवलाय. पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट.
Pune Crime:
Public outrage grows as SIT begins probe into horrific Nasrapur child murder case in Pune.saam tv
Published On
Summary
  • नसरापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचारानंतर हत्या

  • घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट

  • तपासासाठी एसआयटीची स्थापना

रोहित कदम, साम प्रतिनिधी

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावातील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षांच्या नराधमाने लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केली. या घटनेने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली, संतप्त नागरिकांनी शनिवारी रस्त्यावर उतरत पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला.

Pune Crime:
Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले पूल गाठला. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत रुग्णावाहिका जाऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं. नराधमाला फाशीची शिक्षा द्या नाहीतर आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत नागरिकांना तब्बल चार तास रास्ता रोको केलं.

Pune Crime:
Pune Crime: तीन वर्षाच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून; भोरनंतर पुण्यात आणखी एक संतापजनक घटना

अखेर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: घटनास्थळी जात, मुलीच्या आई-वडिलांची आणि आंदोलकांची समजूत काढली. दरम्यान या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरत या प्रकरणात सरकार आरोपी असल्याचं टीकास्त्र सोडलंय. सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आरोपीला मृत्यूदंड देऊन त्याला यमसदनी पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय.

नसरापूरमधील ग्रामस्थांनी चिमुरडीला न्याय मिळण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. वाढत्या दबावानंतर आता सरकारनं या प्रकरणाची दखल घेत थेट एसआयटी तपास करण्याचे आदेश दिलेत. जोपर्यंत अशा नराधमांना कडक शासन होत नाही, मनात दहशत निर्माण होत नाही. तोपर्यंत असा घटना थांबणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com