Crime News: एकीकडे नातेवाईकाच्या लग्नाची धामधूम सुरू; दुसरीकडे सासू अन् जावई शेतात सापडले नको त्या अवस्थेत

Crime News: सासू-जावई अनैतिक संबंध प्रकरणात लग्नसमारंभातून दोघे फरार झाले. १२ वर्षांपासून संबंध असल्याचा खुलासा झाला असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू केली आहे. Crime News mother in law son in law affair having physical relation in farm family scandal both are run from the wedding
Crime News mother in law son in law affair having physical relation in farm family scandal both are run from the wedding
Crime News mother in law son in law affair having physical relation in farm family scandal both are run from the weddingSaam Tv
Published On

Crime News: आग्रामधील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी आणि नातेसंबंधांच्या मर्यादा ओलांडणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सासूने आपल्या जावयासोबत घर सोडून पलायन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना एका कौटुंबिक लग्नसमारंभादरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जावई हा पाच मुलांचा पिता असून तो लग्नासाठी सासरी आला होता. कार्यक्रमादरम्यान काही कामाच्या बहाण्याने त्याने सासूला शेतात नेले. बराच वेळ दोघे परत न आल्याने नातेवाईकांना संशय आला आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधादरम्यान दोघेही शेतात नकोत्या अवस्थेत आढळल्याने उपस्थितांमध्ये संताप उसळला.

Crime News mother in law son in law affair having physical relation in farm family scandal both are run from the wedding
Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

गोंधळ वाढताच संबंधित जावई सासूला दुचाकीवर बसवून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात चर्चा रंगली असून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. तपासात या दोघांमध्ये मागील १२ वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले आहे.

Crime News mother in law son in law affair having physical relation in farm family scandal both are run from the wedding
Crime News: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; व्हिडिओ काढले, ब्लॅकमेल आणि टॉर्चर केलं, अखेर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

यापूर्वीही ही जोडी घर सोडून पळून गेली होती आणि त्यांना दिल्ली येथून परत आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांचे संबंध कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांचे आयुष्य विस्कळीत झाले आहे. एका बाजूला पती धक्क्यात असून दुसरीकडे जावयाच्या पत्नीचीही परिस्थिती गंभीर बनली आहे.

दरम्यान, पीडित पतीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com