Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

Mother Kille 4 Child: उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरमध्ये आईने चार मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना. आरोपी महिला फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू, मानसिक तणाव कारणीभूत असल्याचा पोलीसांचा संशय.
Mother Kille 4 Child
Mother Kille 4 ChildSaam Tv
Published On

Crime News: उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर जिल्ह्यात, एका आईने आपल्याच चार मुलांची निर्घृण हत्या केली. माहितीनुसार, अकबरपूर येथे या आईने विटेने ठेचून तिच्या चार निष्पाप मुलांचा जीव घेतला. हा गुन्हा केल्यानंतर, ती आरोपी महिला घटनास्थळावरून पळून गेली. ही घटना मिरानपूर परिसरात घडली.

हत्येनंतर महिला फरार

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, या महिलेचा पती गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये राहत असून तिथेच काम करत आहे. सौदी अरेबियामध्ये असताना पतीने एका पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' (विवाह) केला होता. या गोष्टीमुळे पत्नीला प्रचंड मानसिक त्रास होत होता. या मानसिक तणावामुळेच, त्या महिलेने आपल्या चार मुलांची हत्या केली आणि त्यानंतर ती घरातून पळून गेली असा पोलिसांना संशय आहे.

Mother Kille 4 Child
Crime News: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीवर अत्याचार; व्हिडिओ काढले, ब्लॅकमेल आणि टॉर्चर केलं, अखेर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

घराच्या आत मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह आढळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजता मिरानपूर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घराच्या आत एका पलंगावर चार लहान मुलांचे रक्ताने माखलेले मृतदेह पडलेले आढळले. घराचा दरवाजा आतून बंद होता आणि मुलांची आई मात्र बेपत्ता असल्याचे समजले. मेहरुआ येथील रहिवासी असलेल्या नियाज याची ही मुले होती. हे कुटुंब मिरानपूर परिसरात राहत होते. नियाज गेल्या अनेक वर्षांपासून सौदी अरेबियामध्ये काम करत आहे आणि त्याने तिथे एका पाकिस्तानी महिलेशी विवाह केला होता.

Mother Kille 4 Child
Diljit Dosanjh: कॉन्सर्टमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर दिलजीत दोसांझ संतापला, नेमकं प्रकरण काय?

पोलिसांच्या तपासातून असे कळले की, या हत्यांमागील मुख्य कारण , पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल समजल्यानंतर ती महिला मानसिक तणावाखाली होती हे असावे. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरू आहे.

आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके सज्ज

आंबेडकर नगरच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) प्राची सिंह यांनी सांगितले की, मृत मुलांचे वय अनुक्रमे १४, १२, १० आणि ८ वर्षे होते. त्या म्हणाल्या, "आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, एका ३५ वर्षीय महिलेने आपल्या मुलांची हत्या केली आणि त्यानंतर ती पळून गेली. पोलीस गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि तिला पकडण्यासाठी विशेष पथके तयार केली जात आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com