Diljit Dosanjh: कॉन्सर्टमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर दिलजीत दोसांझ संतापला, नेमकं प्रकरण काय?

Diljit Dosanjh: बॉर्डर २ फेम अभिनेता दिलजीत दोसांझचे एक विधान समोर आले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. दिलजीत दोसांझने नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात.
Diljit Dosanjh
Diljit DosanjhSaam Tv
Published On

Diljit Dosanjh: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा सतत चर्चेत असतो. सध्या दिलजीत दोसांझ त्याच्या 'ऑरा' (Aura) या शोसाठी दौऱ्यावर आहे. त्याचे शो नेहमीच 'हाऊसफुल्ल' असतात, मग ते देशात असोत किंवा परदेशात. त्याचे लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहते अक्षरशः वेडे झालेले असतात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान, काही लोकांनी झेंडे फडकवून आंदोलन केले. घडलेल्या घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुख्य विषय बनल्या आहेत. यावरुन दिलजीतचा या आंदोलकांवर संतापला. त्याने या आदोलकांना थेट इशारा देत खडे बोल सुनावले.

दिलजीत दोसांझ संतापला

अभिनेता दिलजीत दोसांझ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यामागील कारण म्हणजे त्याने नुकतेच त्याने केलेले एक विधान. दिलजीतच्या कॅनडाच्या शोमध्ये असताना काही खलिस्तानींनी अलीकडेच आलेल्या पुराच्या काळात त्याने पंजाबला भेट न दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली. मात्र, दिलजीतने त्या सर्वांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. स्टेजवरुन बोलताना दिलजीत म्हणाला, 'मी ज्या कोणत्याही चॅनेलवर जातो, तिथे पंजाबबद्दलच बोलतो. मी माझ्या गाण्यांबद्दल बोललो नाही; मी कशाचेही प्रमोशन केले नाही. मी तिथे केवळ आणि केवळ पंजाबसाठी आलो आहे. तुम्हाला हवे तितके ध्वज फडकवा खुशीने फडकवा.'

Diljit Dosanjh
Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

यापूर्वीही आंदोलन झाली

दिलजीत दोसांझला यापूर्वीही आंदोलनाचा सामना करावा लागला आहे. अनेक प्रसंगी, त्याच्या विधानांमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आहे. बॉर्डर २ या चित्रपटाच्या प्रोमोशनदरम्यानही दिलजीत दोसांझ मोठ्या वादात सापडला होता.

Diljit Dosanjh
Marathi Actress: 'बायबल के बारे में बात करनी…'; बोरवलीच्या बाजारात अभिनेत्रीसोबत घडला संशयास्पद प्रकार, VIDEO व्हायरल

दिलजीत दोसांझची कारकीर्द

संगीत क्षेत्रातील कामाव्यतिरिक्त, दिलजीत दोसांझ अनेकदा चित्रपटांमधील त्याच्या कामामुळेही चर्चेत असतो. दिलजीत दोसांझने पंजाबी आणि बॉलीवूड अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. नुकताच तो बॉर्डर २ या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com