Latur News: मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, बाप- लेकाचा दुर्दैवी अंत, एकाच चितेवर अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना
Father Son Death Latur News: Saamtv

Latur News: मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, बाप- लेकाचा दुर्दैवी अंत, एकाच चितेवर अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना

Father Son Death Latur News: पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात गटांगळ्या खात होता, मुलाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या बापाला भीतीपोटी मुलाने गच्च पकडून धरल्याने दोघेही गळात अडकले आणि यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
Published on

संदीप भोसले| लातूर, ता. १८ सप्टेंबर

Father And Son Drowned In Lake: मुलगा तलावात बुडत असल्याचे पाहून वडील मदतीला धावले मात्र दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडली. बाप-लेकाच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूनंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Latur News: मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, बाप- लेकाचा दुर्दैवी अंत, एकाच चितेवर अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना
Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरु असतानाच लातूरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. लातूरच्या जळकोट तालुक्यामध्ये बाप- लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नामदेव त्रिपती पवार (वय, १२) असे मृत मुलाचे तर त्रिपती बापूराव पवार वय (42) असे वडिलांचे नाव आहे. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथील शेतकरी त्रिपती बापूराव पवार वय (42) आणि 12 वर्षीय मुलगा नामदेव त्रिपती पवार हे दोघे बापलेक बैल धुण्यासाठी गावातील पाझर तलावाकडे गेले होते, दरम्यान बैल धुवून बाहेर येत असताना बैल खोल पाण्यात जात असल्याने मुलगा नामदेव हा बैलांना बाहेर काढण्यासाठी गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने मुलगा पाण्यात गटांगळ्या खात होता. मुलाला बाहेर काढण्यासाठी गेलेल्या बापाला भीतीपोटी मुलाने गच्च पकडून धरल्याने दोघेही गाळात अडकले आणि यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

Latur News: मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, बाप- लेकाचा दुर्दैवी अंत, एकाच चितेवर अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना
Ganpati Visarjan 2024: दिवस उजाडताच 'डी. जे'चा दणका! मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु; १८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

या घटनेची माहिती जवळच असलेल्या शेतकऱ्यांना मिळाली आणि त्यांनी इतर शेतकऱ्यांना बोलून या दोघांनाही बाहेर काढले., मात्र दोघांचाही जागीच दुर्दैवी अंत झाला होता., त्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा जळकोट येथील पोलीस अधिकाऱ्यांनी केला व दोघांचेही मृतदेह शवविच्छधानासाठी जळकोट येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. बाप-लेकाच्या मृत्यूनंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. काळीज हेलावून टाकणारे ते दृश्य पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते.

Latur News: मुलगा बुडत होता, वडील मदतीला धावले, बाप- लेकाचा दुर्दैवी अंत, एकाच चितेवर अंत्यसंस्कार; मन हेलावणारी घटना
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी? CM शिंदेंच्या जवळच्या नेत्याने तारीखच सांगितली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com