Maharashtra Politics: आमदार अपात्रता प्रकरणावर आज 'सर्वोच्च' सुनावणी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आज फैसला होणार?

Shivsena And NCP MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये कोर्ट नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लागले आहे.
Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज महत्वाची सुनावणी, कोर्टात काय घडणार?
Shiv Sena And NCP MLA Disqualification Case Saam Tv
Published On

प्रमोद जगताप, दिल्ली

शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रता प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र केले नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे गटाकडून आणि शरद पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकडे दोन्ही राजकीय पक्षांसोबत संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र केलं नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मागच्या आठवड्यात कोर्टाने या सुनावणीसाठी ३ तारखा निश्चित केल्या होत्या. मात्र त्यावर सुनावणी झाली नव्हती.

सुप्रीम कोर्टाने जरी आजची तारीख निश्चित केली असली तरी प्रकरण नंबर खूप खाली असल्याने प्रकरण सुनावणीला येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आज याप्रकरणावर सुनावणी होते की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे. ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या वकिलांनी प्रकरण मेंशन केलं तर लवकरची तारीख कोर्ट निश्चित करू शकते. कोर्ट सुनावणीसाठी कधीची तारीख देते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज महत्वाची सुनावणी, कोर्टात काय घडणार?
Maharashtra politics : मविआचा विदर्भात ३३ जागांवर तिढा, २९ जागांवर एकमत; महायुतीचं ७० टक्के जागांवर एकमत!

दरम्यान, भारताचे सरन्यायधीश डी वाय चंद्रचूड १० नोव्हेंबर २०२४ ला सेवानिवृत्त होणार आहेत. ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी संपवणे महत्वाचे असणार आहे. १० नोव्हेंबरला रविवार असल्याने चंद्रचूड यांचा सेवानिवृत्ती दिवस 8 नोव्हेंबर असणार आहे. चंद्रचूड यांच्या पिठासमोर महाराष्ट्राच्या महत्वाच्या २ सुनावण्या आहेत. त्या सुनावण्या ते सेवानिवृत्त होण्यापूर्वी व्हाव्यात असे अनेकांचे मत आहे.

Maharashtra Politics: शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर आज महत्वाची सुनावणी, कोर्टात काय घडणार?
Maharashtra Politics: ...म्हणून लक्ष्मण पवारांची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे यांचा पलटवार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com