सांगली : सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान ठाकरे आणि शिंदे गट शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला आहे. बसवर लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे पोस्टरवर काळे फसल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते आंदोलन करणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर धावून आले होते.
रत्नागिरी (Ratnagiri) येथे पार पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मेळाव्यासाठी सांगली डेपोतील बस मोठ्या प्रमाणात रवाना करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे; असा आरोप करत शिवसेना ठाकरे आंदोलन करण्यात आलं होतं. तसेच ठाकरे गट शिवसेनेकडून (Shiv Sena) मिरज बसस्थानकामध्ये ठिय्या मारत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी बसस्थानकातील बसेसवर लावण्यात आलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या पोस्टरला काळे देखील फासण्यात आले. हा प्रकार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला.
पोलिसांनी घेतले ताब्यात
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला शिवसेना (Eknath shinde) एकनाथ शिंदे गटाकडून आक्षेप घेण्यात आला. यामुळे मिरज बस स्थानकामध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. दोन्ही गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.