संदीप भोसले
लातूर : आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर असल्यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार लातूरमध्ये देखील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येते आहे. या दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघावर दावा करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha election) लागण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष आणि पक्षाचे उमेदवार कामाला लागले आहेत. विधानसभांच्या जागांवर दावा देखील ठोकण्यात येत आहेत. प्रामुख्याने महाविकास आघाडी व महायुती यांच्यामध्ये लढत राहणार असली तरी जागा वाटपावरून मित्र पक्षांमध्ये रस्सीखेच होत असल्याचे पाहण्यास मिळू लागले आहे. दरम्यान अधिकृत जागावाटप होण्या अगोदरच (Latur) लातूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडीतल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे.
दोन्ही जागांवर दावा
मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेत लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही जागांवर दावा ठोकण्यात आला आहे..तर या आधी लातूर ग्रामीणच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार होता. तर शहर विधानसभा परंपरेने भाजपची जागा आहे. मात्र या दोन्ही जागांवर आता महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केला आहे. त्यामुळे आता नेमकी कोणती जागा कुणाला सुटणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.