लातूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; २ दिवसांत ६ जणांचा अपघाती मृत्यू

latur accident : लातूरमध्ये पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
latur news
Latur accident Saam tv
Published On

लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात

तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी

रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू

संदिप भोसले, साम टीव्ही

लातूर-नांदेड महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. लातूरमधील बुधोडापाटीजवळ मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-तुळजापूर महामार्गावरच्या बुधोडापाटी येथे कार आणि जीपचा मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहत. लातूरच्या दिशेने येणाऱ्या जीप गाडीला भरधाव वेगात येणाऱ्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात मृत्यू पावलेली ही व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

latur news
एकाच गावातील ८ मित्रांचा मृत्यू; भरधाव कार थेट १८०० फूट खोल दरीत कोसळली, थरकाप उडवणारा अपघात कसा झाला?

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने अपघातात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तर जखमींवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक सुरळीत केली.

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात

तत्पूर्वी, लातूर-नांदेड महामार्गावरील अलगरवाडी पाटीजवळ शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. कंटेनर, कार आणि दुचाकी या तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघात दुचाकीवर प्रवास करणारे पती-पत्नी आणि कारमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत.

latur news
लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात; कंटेनर,कार, दुचाकीची एकमेकांना धडक, तिघांचा जागीच मृत्यू

जनार्दन येणगे आणि सविता येणगे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत जाली होती. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com