लाडकी बहीण योजनेतील e-KYC चुकांसाठी सरकारची शेवटची संधी
पात्र असूनही अपात्र ठरलेल्या महिलांना मोठा दिलासा
31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज दुरुस्ती शक्य
वेळेत दुरुस्ती केल्यास ₹1500 चा लाभ पुन्हा सुरू राहणार
राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करताना टेक्निकल किंवा चुकून एखादी माहिती भरायची राहून गेली होती. त्यांना आता या अर्जामध्ये ही माहिती पुन्हा भरण्याची संधी आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांनी e-KYC पूर्ण केले होते. मात्र घरातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा पेन्शनबाबतचा पर्याय निवडताना अनेक महिलांकडून चुकीची माहिती भरली होती. यामुळे पात्र असूनही अनेक महिलांचे अर्ज अपात्र होणार होते. जिल्हाधिकारी स्तरावर याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू आहे. पण प्रक्रियेला वेग देण्यासाठी आता ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली आहे.
31 मार्च 2026 पर्यंत शेवटच्या टप्प्यात ज्या महिलांच्या अर्जात कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा पेन्शन घेणे या पर्यायाबाबत चूक झाली आहे अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती करता येईल.
ह्या सर्व चुका बदलण्याची ही शेवटची संधी असेल. यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही. पोर्टलवर आता बदल करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी महिलांनी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकतात. लाडक्या बहीणींनी लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत e-KYC मधील ही सुधारणा करून घ्यावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.