

सोन्याचे दर पुन्हा घसरले
१० तोळ्यामागे २० हजारांची घसरण
आजचे सोन्याचे दर वाचा
सोन्याच्या दरात मागच्या आठवड्यापासून सतत चढ-उतार होताना दिसत आहे. एक आठवड्याआधी सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. सोन्याचे दर १.८० लाखांवर गेले होते. त्यानंतर पुन्हा हे दर कमी होत आहेत.मागच्या आठवड्यात सलग ५ दिवस सोन्याचे दर घसरले होते. त्यांतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात आज प्रति तोळ्यामागे २०७० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १,५२,३५० रुपये झाले आहेत. वाचा आजचे सोन्याचे दर
२४ कॅरेटचे दर (24K Gold Rate)
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे २०७० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,५३,३५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,६५६ रुपयांनी घसरले आहेत. हे भाव १,२१,८८० रुपये झाले आहेत.१० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची घसरण झाली आहे.
२२ कॅरेटचे दर (22K Gold Rate)
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,९०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,३९,६५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,५२० रुपयांनी घसरले असून हे दर १,११,२७० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोनं १९००० रुपयांनी स्वस्त झालं असून हे दर १३,९६,५०० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेटचे दर(18K Gold Rate)
१८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे १,५६० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१४,२६० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर १,२४८ रुपयांनी घसरून ९१,४०८ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर १५,६०० रुपयांनी घसरले असून हे दर ११,४२,६०० रुपये झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.