Todays Gold Rate : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, पाहा मुंबई-पुण्यातील ताजे दर

Gold price today in Mumbai Pune 24 carat : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १.५४ लाखांवर, तर शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीत मोठी पडझड पाहायला मिळाली.

Today gold rate in India : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदी तब्बल 27 हजार 884 रुपयांनी स्वस्त होऊन 2 लाख 46 हजार 665 रुपये प्रति किलोवर आलीये.. सोन्याच्या दरातही घट झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 54 हजार 420 रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेलाय... सोनं आणि चांदीच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळालाय. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत ही घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे

शेअर बाजारात मोठी पडझड -

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांनी, तर निफ्टी 164 अंकांनी घसरलाय... इंडिगो, झोमॅटो आणि रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले. गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरल्याने बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com